Video : ए भाई, जरा देखके चलो, आगे ही नहीं पीछे भी... का आली असे म्हणण्याची वेळ?

नीलेश झाडे
रविवार, 19 जानेवारी 2020

तीन वर्षांत सतत एकाच ठिकाणी जर पाच मोठे अपघात झाले तर त्या स्थळाला "ब्लॅक स्पॉट' (अपघात स्थळ) ठरविले जाते. जिल्ह्यात असे एकूण 28 "ब्लॅक स्पाट' ठरविण्यात आले.

धाबा (जि. चंदपूर) : चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वाधिक अपघात होणाऱ्या स्थळांची यादी उपप्रादेशिक परिवहन विभागाने जाहीर केली आहे. जिल्ह्यातील एकूण 28 अपघात स्थळांवर अपघातांची संख्या मोठी आहे. यात चंद्रपूर शहरातील सहा स्थळाचा समावेश आहे. त्या पाठोपाठ राजुरा आणि कोरपणा तालुक्‍यातील अपघात स्थळांचा समावेश आहे.

road ब्लॅक स्पॉट साठी इमेज परिणाम

चंद्रपूर जिल्ह्यात अपघातांची वाढती संख्या चिंतेचे कारण ठरले आहे. अशातच उपप्रादेशिक परिवहन विभाग, पोलिस विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील अपघात स्थळांचे सर्वेक्षण केले. जिल्ह्यात सर्वाधिक अपघात होणारे 28 अपघात स्थळ आढळून आली आहेत. चंद्रपूर शहरात सहा अपघात स्थळे अशी आहेत की जिथे अपघातांची संख्या मोठी आहे. चंद्रपूर शहरा पाठोपाठ राजुरा तालुक्‍यात चार आणि कोरपना तालुक्‍यात तीन स्थळावर अपघातांची संख्या सर्वाधिक आहेत.

सविस्तर वाचा - मुलांना विकणारी 'सपना शूटर' आहे तरी कोण?

अशी आहेत अपघात स्थळे 

 • चंद्रपूर - बंगाली कॅम्प, वरोरा नाका, अष्टभुजा , विसापूर फाटा, पडोली, आणि घंटा चौकी चौकी 
 • भद्रावती - कोंढा फाटा, आणि घोङपेठ 
 • वरोरा - आनंदवन चौक 
 • चिमूर - काम्पा - टेम्पा 
 • नागभीड - जुना बस स्थानक, ब्रम्हपुरी - नागभीड मार्ग 
 • ब्रम्हपुरी - ख्रिस्तानंद चौक, ब्रम्हपुरी- वडसा मार्ग 
 • सिंदेवाही - बस स्थानक चौक 
 • सावली - फुले चौक 
 • मूल - जानाळा 
 • गोंडपिपरी - कोठारी वळण मार्ग, झरण 
 • बल्लारपूर - पेपर मिल चौक, बामणी फाटा 
 • राजुरा - वर्धा नदी ब्रिज, बस स्थानक चौक, आदिलाबाद फाटा,लक्कडकोट 
 • कोरपना - अंबुजा सिमेंट चौक, भगत सिंग चौक,(गडचांदूर) आसिफाबाद चौक

road ब्लॅक स्पॉट साठी इमेज परिणाम

कसे ठरवितात 'ब्लॅक स्पॉट'

तीन वर्षांत सतत एकाच ठिकाणी जर पाच मोठे अपघात झाले तर त्या स्थळाला "ब्लॅक स्पॉट' (अपघात स्थळ) ठरविले जाते. जिल्ह्यात असे एकूण 28 "ब्लॅक स्पाट' ठरविण्यात आले. प्रवाशांना "ब्लॅक स्पॉट'ची माहिती होण्यासाठी "ब्लॅक स्पॉट'वर झेब्रा क्रासिंग पट्टी, स्पीड ब्रेकर, दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. 

रुग्णवाहिका कमी

जिल्ह्यात एकूण 23 रुण्गवाहिका (108) कार्यरत आहेत. ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी प्रत्येकी एक 108 रुग्णवाहिका देण्यात आली आहे. मात्र, अपघातांची संख्या अधिक असलेल्या राजुरा, वरोरा, घुग्गुस येथे दोनच 108 कार्यरत आहेत.

हेही वाचा - प्रेयसीच्या खूनप्रकरणी शिक्षा; शिक्षा भोगताना तब्येत झाली खराब, मग...

'ब्लॅक स्पॉट' दुरुस्त होतील 
जिल्ह्यात सर्हे करून शासनाच्या नियमानुसार "ब्लॅक स्पॉट' ठरविण्यात आले आहेत. शार्ट टर्न "ब्लॅक स्पॉट'च्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहेत. लॉंग टर्न ब्लॅक स्पॉटचे काम सुरू आहे. जिल्ह्यात मार्ग रुंदीकरण, नवीन मार्गाचे बांधकाम सुरू आहेत. बांधकाम पूर्ण झाल्यावर आपोआपच "ब्लॅक स्पॉट' दुरुस्त होतील. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, आरटीओ, वाहतूक पोलिस विभागाशी समन्वय सुरु आहे. 
- विश्‍वभंर शिंदे 
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच अपिलीय अधिकारी, चंद्रपूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 28 accident prone places in Chandrapur district