का घेताहेत शेतकरी हा टोकाचा निर्णय...

28 farmers end their lives in lockdown
28 farmers end their lives in lockdown

यवतमाळ : अनेक संकटांशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्यांनी कोरोनाचाही मुकाबला सुरू केला आहे. असे असले तरी गेल्या तीन महिन्यांत 28 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. मार्च महिन्यात आठ, एप्रिल 16 तर मे महिन्यात आतापर्यंत चार शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.

नैसर्गिक, सुलतानी संकट, शेतमालाला नसलेला भाव, कर्जाचा डोंगर अशा अनेक संकटांमध्ये अडकलेल्या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपला जीवन प्रवास थांबविला. 2001 ते 2020 या काळात तब्बल साडेचार हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. चौकशी केल्यानंतर यातील एक हजार 775 पात्र तर दोन हजार 691 शेतकरी आत्महत्या अपात्र ठरल्या आहेत.

गेल्या वीस वर्षांच्या काळात शेतकरी आत्महत्या कमी व्हाव्यात यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या गेल्या. मात्र, यातील किती योजनांचा शेतकऱ्यांना थेट लाभ झाला यावर वादविवाद सुरूच आहे.

असे असले तरी शेतकऱ्यांमागे लागलेले समस्यांचे शुक्‍लकाष्ठ काही संपलेले नाही. कधी अस्मानी तर कधी सुलतानी अशा संकटात शेतकरी कायमच अडकलेला आहे. यंदा तर कोरोनाच्या संकटातही शेतकरीच अधिक भरडला गेला. रब्बी हंगामात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना या काळातील पीक एकतर कवडीमोल भावाने तर काहींवर अक्षरश: फेकून देण्याची वेळ आली.

त्यामुळे शेतकरी या काळातही अडचणीत आला. देश लॉकडाऊन असताना शेतकरी आपल्या शेतातील माल विकावा कसा या मानसिकतेत होते. यामुळेच लॉकडाउनच्या काळात जिल्ह्यातील 28 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. जानेवारी ते मे या काळात जिल्ह्यातील 74 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील 73 प्रकरणे चौकशीत असून, एक शेतकरी आत्महत्या अपात्र ठरली आहे. येणाऱ्या काळात शेती तसेच शेतकरी या वर्गाला कसा दिलासा देता येईल, याचा विचार होणे आता गरजेचे आहे.
 

वर्ष-आत्महत्या


2001 ते 2006-776
2007 ते 2014-2279
2015 ते 2016-658
2017-242
2018-255
2019-290
2020-74

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com