वणीत एकाच दिवशी 29 लाखांची रोकड जप्त

File photo
File photo

वणी (जि. यवतमाळ) : शहरालगतच असलेल्या लालगुडा चौकी येथे निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने बुधवारी (ता. 25) रात्री 10 वाजताच्या सुमारास चारचाकी वाहनातून चार लाख रुपयांची रोकड जप्त केली. विशेष म्हणजे सकाळच्या सुमारास एका दुचाकीतून 25 लाख रुपये जप्त करण्यात आले होते. त्यामुळे एकाच दिवशी झालेल्या दोन कारवाईत एकट्या वणीतून तब्बल 29 लाख रुपये जप्त करण्यात आले.
राजकीय पक्ष व उमेदवारांन कडून विधानसभा निवडणुकीत मतदारांना प्रलोभन दाखवण्याकरिता दारू व पैशांचा वापर केला जाऊ शकतो. या प्रकाराकडे निवडणूक विभाग विशेष लक्ष ठेऊन आहे. मतदारसंघात ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. बुधवारी (ता. 25) रात्री 10 वाजताच्या सुमारास निवडणूक विभागाच्या भरारी पथकाला एम.एच. 32 बी.एफ. 8831 या चारचाकी वाहनातून वणीकडे रोकड नेण्यात येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार शहरालगतच असलेल्या लालगुडा चौकी येथे घुगूसकडून येणाऱ्या वाहनाची तपासणी करण्यात आली. यावेळ आत बसलेला सर्फउद्दीन शाहा ननें शाहा (रा. राजुरा, जि. चंद्रपूर) याच्याजवळ चार लाख रुपयांची रोकड आढळून आली. कोणतेही पुरावे सादर करू न शकल्याने भरारी पथकातील नायब तहसीलदार वैभव पवार, मंडळ अधिकारी नितीन बांगडे, उल्हास निमेकर, पीएसआय गोपाल जाधव यांनी रोकड ताब्यात घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com