चौकीदार ठेवूनही तीन संगणक चोरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

हिवरखेड (अकोला) : येथील जिल्हा परिषद महात्मा गांधी विद्यालयात चौकीदार ठेवलेला असून आणि सदर विद्यालय हे अत्यंत रहदारीच्या मेन रोडवर असूनही अज्ञात चोरट्याने तीन संगणक संच  चोरून नेल्याची घटना उघडकीस आल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. 

हिवरखेड (अकोला) : येथील जिल्हा परिषद महात्मा गांधी विद्यालयात चौकीदार ठेवलेला असून आणि सदर विद्यालय हे अत्यंत रहदारीच्या मेन रोडवर असूनही अज्ञात चोरट्याने तीन संगणक संच  चोरून नेल्याची घटना उघडकीस आल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. 

हिवरखेड येथील जिल्हा परिषद महात्मा गांधी विद्यालयात कॉम्प्युटर तज्ञ शिक्षक नियुक्त नसल्यामुळे येथील अनेक  कॉम्प्युटर लॅब मध्ये तसेच धूळखात पडलेले होते. सदर खोलीला कुलूप लावलेले होते.  ह्या खोलीचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने त्यामधून तीन संगणक मॉनिटर, आणि दोन सीपीयू असा हजारो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. ही घटना दिनांक 3 एप्रिल रोजी सकाळी  निदर्शनास आल्यानंतर प्रभारी मुख्याध्यापक अजय हरिभाऊ पाटकर यांनी हिवरखेड पोलिसांकडे लेखी तक्रार दिली.

मुख्याध्यापकांनी दिलेल्या तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंड विधान 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे. 
घटनेच्या वेळी चौकीदार शाळेत हजर होता की नाही याची माहिती मिळू शकली नाही.

विशेष म्हणजे जिल्हा परिषद तर्फे येथे शासकीय पगारातून चौकिदार नियुक्त केलेला नव्हता. त्यामुळे शाळेत चोरीच्या गुन्ह्या सारखा गंभीर प्रकार घडू नये यासाठी शाळेतील मुख्याध्यापकांनी आणि शिक्षकांनी आपसात वर्गणी करून येथे खाजगी चौकीदार केला होता. तरीही चोरट्यांनी हाथ मारल्यामुळे चौकीदाराचा पगार नाहक भरत असल्याची जाणीव शिक्षकांना झाल्याचे बोलल्या जात आहे..

या घटनेचा पुढील तपास ठाणेदार सोमनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल नंदू सुलताने हे करीत आहेत.

Web Title: 3 computers stoles even when security is there