Accident News: बुलडाण्यात 2 कार आणि एका दुचाकीचा भीषण अपघात; 3 जणांचा जागीच मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident News

Accident News: बुलडाण्यात 2 कार आणि एका दुचाकीचा भीषण अपघात; 3 जणांचा जागीच मृत्यू

बुलढाणा जिल्ह्यात भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. बुलढाण्यातील खामगाव-मेहकर मार्गावर एक भयानक अपघात झाला. भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीने समोरून येणाऱ्या एका कारला जोरदार धडक दिली. इर्टिका कार बोलेरो गाडी आणि दुचाकीचा विचित्र अपघात या घडला. अपघात इतका भीषण होता, की त्यामध्ये दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला असून दुचाकीवर असलेले 3 जण जागीच ठार झाले आहेत.

खामगाव-मेहकर मार्गावरील देऊळगाव सकर्शा गावाजवळ काल (शनिवारी) रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, तीन तरुण खामगाव-मेहकर महामार्गावरून दुचाकी घेऊन सुसाट वेगाने निघाले होते. त्याचवेळी समोर कार येत होती.

दुचाकीचा वेग जास्त असल्याने तरुणाचं दुचाकीवरील नियंत्रण सुटलं आणि ते समोरील कारला धडकले. हा अपघात इतका भीषण होता की, कारची धडक बसताच दुचाकीसह तरुण बाजूला फेकले गेले आणि दुसऱ्या कारला जाऊन आदळले. त्याचवेळी दोन्ही कारचालकांचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि त्यांची सुद्धा जोरदार धडक झाली.

या विचित्र अपघातात दुचाकीवरील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कारमधील एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याशिवाय तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृत तरुणांचे मृतदेह ताब्यात घेतले असून कारमधील व्यक्तींना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मृत तरुणांची नावे अद्याप कळू शकली नाही. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर अपघातग्रस्त वाहन त्यांनी रस्त्याच्या एका बाजूला काढले. अपघातामुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या अपघातात 3 जण जागीच ठार झाले असून अर्टिका कार आणि बोलेरो गाडीतील नागरिक जखमी झाले आहेत.

अपघातात जखमी झालेल्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातात नेमकी चूक कोणाची याचा शोध सध्या पोलीस घेत असून या प्रकरणात चूक असणाऱ्यावर पोलीस गुन्हा दाखल करणार आहेत.

टॅग्स :accidentaccident news