खासगी बसने मायलेकासह मुलीस चिरडले

bus
bus

बार्शीटाकळी (अकोला) : तालुक्यातील दगडपारवा येथील आयटीआय जवळ एका खासगी बस व दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील मायलेकासह एक मुलगी जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी (ता. 23) सकाळी घडली. या अपघातामुळे संतप्त जमावाने बसला पेटवून दिले होते. घटनास्थळी पोलिस ताफा पोहचला होता.

तालुक्यात खासगी वाहतुकीला उधाण आले आहे. खासगी प्रवासी वाहतूक करणारी बस क्रमांक एम.एच. 37 बी. 6949 अकोला येथून मंगरुळपीरकडे जात होती. त्याचवेळी दगडपारवा येथून एक दुचाकी बार्शीटाकळीच्या दिशेने येत होती. या खासगी बसने बार्शीटाकळी व दगडपारवा गावाच्या दरम्यान असलेल्या आयटीआय जवळ विरुद्ध दिशेने येत असलेल्या दुचाकीला धडक दिली. ही धडक एवढी जबर होती की, यामध्ये दुचाकीवरील अनुराधा प्रकाश राठोड (वय 45), नितीन प्रकाश राठोड (वय 19) हे दोघेही रा. दगडपारवा व अस्मिता पवार (वय 17) रा. दहातोंडा, ता. मूर्तिजापूर यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच दगडपारवा येथील ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेतली. यावेळी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी खासगी बसची तोडफोड केली. ग्रामस्थ एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी बस पेटवून दिली. घटनेची माहिती समजताच बार्शीटाकळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com