गाेवर-रुबेला लसीमुळे 30 बालकांना ‘रिअॅक्शन’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 डिसेंबर 2018

जिल्ह्यात गाेवर, रूबेला माेहिमेची प्रभाविपणे अंमलबजावणी सुरू आहे. लसीकरणादरम्यान काही बालकांना रिअॅक्शन झाल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत. अपवादात्मक स्थितीत रिअॅक्शन हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकांनी न घाबरता त्यांच्या पाल्यांचे लसीकरण करावे. 

- डॉ. एम.एम. राठाेड, जिल्हा आराेग्य अधिकारी, जिल्हा परिषद अकाेला

अकाेला : गोवर, रुबेला लस दिल्यामुळे जिल्ह्यात गेल्या चार दिवसांत 30 शालेय बालकांना रिअ‍ॅक्शन झाल्याची बाब समाेर आली आहे. त्यापैकी दाेन मुलींची तब्येत अत्यवस्थ झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या प्रकारामुळे आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. 

विषाणूजन्य गाेवर व संसर्गजन्य रूबेला राेगाच्या उच्चाटनासाठी जिल्ह्यात गोवर व रूबेला एकत्रित लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. माेहिमेचा राज्यभर 27 नाेव्हेंबरपासून शुभारंभ करण्यात आला. त्याअंतर्गत जिल्ह्यातील शहरीसह ग्रामीण भागातील शाळा व अंगणवाड्यातील बालकांना आराेग्य विभागाच्या वतीने गाेवर, रूबेलाची लस देण्यात येत आहे. लसीकरणानंतर बालक गोवर आणि रूबेला या दोन आजारापासून सुरक्षित हाेत असल्याचा दावा आराेग्य विभागाच्या वतीने करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात मात्र लस घेतल्यामुळे बालकांना रिअॅक्शन हाेण्याच्या घटना समाेर येत आहेत.

अभियान सुरू झाल्याच्या तारखेपासूनच जिल्ह्यात लसीमुळे रिअॅक्शन झालेल्या बालकांची संख्या 30 वर पाेहचली आहे. त्यापैकी संस्कृती अरूण साेनाेने (रा. अकाेट, वय १५ वर्षे)  या मुलीची तब्बेत खालावल्याने तिला सर्वाेपचार रुग्णालयात तर श्रेया मुलसिंग राठाेड (रा. आलेगाव, वय ५ वर्षे) या मुलीला खाजगी रुग्णालयात भरती करावे लागले. उपचारानंतर दाेन्ही मुलींच्या प्रकृतीत सुधारणा हाेत असल्याची माहिती आहे. लसीकरणानंतर रिअॅक्शन हाेणाऱ्या बालकांची संख्या वाढत असल्यामुळे लस दिल्यानंतर एक लाखात एखाद्या बालकालाच रिअॅक्शन हाेऊ शकते, असा आराेग्य विभागाचा दावा फाेल ठरत असल्याचे दिसून येत आहे.

रिअॅक्शनचे प्रमाण मुलींमध्ये सर्वाधिक

जिल्ह्यात आतापर्यंत रिअॅक्शन झालेल्या 30 बालकांमध्ये मुलींचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येत आहे. तर रुग्णालयात सुद्धा दाेन मुलींनाच भरती करण्यात आले आहे. लस घेतल्यानंतर अंगाला खाज येणे, उलटी होणे, अंगावल लहान फाेड येण्यासारखे प्रकार हाेत आहेत. 

88 हजार बालकांना दिली लस

आराेग्य विभागाच्या वतीने आतापर्यंत ८८ हजार ३३९ बालकांना गाेवर, रुबेलाची लस देण्यात आली आहे. माेहिमेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे २७ नाेव्हेंबर राेजी २६ हजार ६०१, २८ नाेव्हेंबरला २१ हजार ८८९, २९ ला २० हजार ३८० तर ३० नाेव्हेंबरला १९ हजार ४६९ बालकांचे लसीकरण करण्यात आले. 

रिअॅक्शन झालेल्या बालकांची माहिती
तारीख              संख्या
२७ नाेव्हेंबर        ०५
२८ नाेव्हेंबर        १३
२९ नाेव्हेंबर        ०५
३० नाेव्हेंबर        ०7

Web Title: 30 children get Reaction due to Gavar and Rubella vaccine