हिंगणा तालुक्‍यात 30 कोटींची कर्जमाफी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जून 2019

हिंगणा : खरीप हंगाम 2018-19 मध्ये पावसाने दगा दिल्याने शेतकरी संकटात सापडला होता. दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वेक्षण करून अहवाल पाठवला होता. कर्जमाफीसाठी तालुक्‍यातील 4,257 शेतकरी पात्र ठरले असून, 29 कोटी 82 लाख 89 हजारांची कर्जमाफी केली आहे. ही आकडेवारी सहायक निबंधक सहकारी संस्थेने दिलेल्या अहवालातील आहे. हिंगणा तालुक्‍यात मागील वर्षीच्या खरीप हंगामात ज्वारी 359 हेक्‍टर, तूर 4,887 हेक्‍टर, मूग 27, उडीद 16, सोयाबीन 2,178, कापूस 23,553, ऊस 17, इतर भाजीपाला 615, फुलशेती 203 हेक्‍टर असे एकूण 32,025 हेक्‍टरमध्ये पेरणी करण्यात आली होती.

हिंगणा : खरीप हंगाम 2018-19 मध्ये पावसाने दगा दिल्याने शेतकरी संकटात सापडला होता. दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वेक्षण करून अहवाल पाठवला होता. कर्जमाफीसाठी तालुक्‍यातील 4,257 शेतकरी पात्र ठरले असून, 29 कोटी 82 लाख 89 हजारांची कर्जमाफी केली आहे. ही आकडेवारी सहायक निबंधक सहकारी संस्थेने दिलेल्या अहवालातील आहे. हिंगणा तालुक्‍यात मागील वर्षीच्या खरीप हंगामात ज्वारी 359 हेक्‍टर, तूर 4,887 हेक्‍टर, मूग 27, उडीद 16, सोयाबीन 2,178, कापूस 23,553, ऊस 17, इतर भाजीपाला 615, फुलशेती 203 हेक्‍टर असे एकूण 32,025 हेक्‍टरमध्ये पेरणी करण्यात आली होती. मात्र, पावसाने पाठ फिरवल्याने उत्पादनात घट झाली होती. कापसाचे पीक शेतात डोलत असताना गुलाबी बोंडअळीने हल्ला केला. यामुळे शेतकरी संकटात सापडला होता. हिंगणा तालुक्‍यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली. यामुळे कृषी व महसूल विभागाने सर्वेक्षण करून सरकारकडे अहवाल पाठवला. यानंतर राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. तालुक्‍यातील सहा महसूल मंडळांपैकी केवळ दोन महसूल मंडळांतील शेतकरी कर्जमाफीच पात्र ठरले. राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी जाहीर केली.
नव्या खरीप हंगामात 39 लाखांचे कर्ज वाटप
सन 2019-20 या खरीप हंगामास प्रारंभ झाला आहे. मृग व रोहिणी नक्षत्र आटोपत असताना अद्यापही पावसाने हजेरी लावली नाही. शेतकऱ्यांनी बियाण्यांची खरेदी सुरू केली आहे. पहिला पाऊस पडताच पेरणीच्या कामाला सुरुवात होऊ शकते. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांनी तालुक्‍यातील 42 शेतकऱ्यांना नवीन खरीप हंगामासाठी 39 लाख 12 लाखांचे कर्ज वाटप केले आहे. इतर राष्ट्रीय बॅंकांची कर्ज वाटप प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे याची अधिकृत आकडेवारी अद्याप उपलब्ध झालेली नाही. तालुक्‍यातील सहा महसूल मंडळापैकी दोन महसूल मंडळातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा लाभ मिळणार आहे. उर्वरित चार महसूल मंडळे दुष्काळापासून वंचित राहिली आहेत. या चारही महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना सरकारने कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी माफक अपेक्षा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 30 crores debt waiver to farmers in hingna