गडचिरोलीच्या तीनशे गावांचा संपर्क तुटला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

गडचिरोली : जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तीनशेच्यावर गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. भामरागड लगतची पर्लकोटा नदी दुथडी भरून वाहत असल्याने भामरागड-आलापल्ली मार्ग आज, शुक्रवारी सकाळपासून पुन्हा दुसऱ्यांदा बंद झाला. येथील पुलावरून तीन ते चार फूट पाणी वाहत आहे. बाजारपेठेत पुराचे पाणी शिरण्याची शक्‍यता लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

अहेरी तालुक्‍यातील किष्टापूर नाला, गडअहेरी नाला, पेरमिली नाला, येरमणार नाला, धानोरा, चामोर्शी, सिरोंचा, एटापल्ली, कोरची तसेच गडचिरोली तालुक्‍यात पूर परिस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटल्याने नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. गेल्या आठवड्यात भामरागडलगतच्या पर्लकोटा नदीला पूर आल्याने 28 जुलै ते 31 जुलैपर्यंत सतत चार दिवस भामरागड तालुक्‍याचा जगाशी संपर्क तुटलेला होता तसेच मार्गही बंद होता. त्यानंतर आज पुन्हा भामरागड तालुक्‍यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोठी, मन्नेराजाराम, हेमलकसा, आरेवाडा या मार्गाची वाहतूक ठप्प असून कुमरगुडा नाल्याला पूर आल्याने पेरमिली मार्गसुद्धा बंद झाला आहे. संततधार पावसामुळे शंभराहून अधिक गावात वीजपुरवठा तसेच भ्रमध्वनी सेवा ठप्प आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 300 villeges got disconnected from district headquarter