esakal | चिंताजनक : 31 मार्चपुर्वी पीककर्ज कसे भरावे?; ‘ते’ 50 हजारही हातचे जाणार
sakal

बोलून बातमी शोधा

crop loan.jpeg

पीककर्ज वसुलीसाठी बॅंकांचे अधिकारी शेतकऱ्यांच्या उंबरठ्यावर जात आहेत. एकूणच सध्याची परिस्थिती शेतकऱ्यांची कसोटी पाहणारी ठरत आहे.

चिंताजनक : 31 मार्चपुर्वी पीककर्ज कसे भरावे?; ‘ते’ 50 हजारही हातचे जाणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना विषाणू रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदी लागू झालेली असून, बाजारपेठा ठप्प झालेल्या आहेत. नाफेडची खरेदी थांबविण्यात आलेली आहे. ज्यांनी आधी माल विक्री केली त्यांच्या पैशांबाबत अद्याप काही माहिती मिळत नाही. अशा परिस्थितीत नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 31 मार्चपुर्वी कर्जपरतफेड कशी करायची याची चिंता सतावत आहे. या तारखेपर्यंत पीककर्ज न भरल्यास थकीतचा शिक्का लागेल व शासनाकडून नियमित कर्जदारांना मिळू पाहणारे 50 हजारांचे अनुदानही मिळणार नाही, हाही पेच शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने बाजारपेठांमधील खरेदी-विक्री ठप्प झाल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. घरात असलेला शेतमाल विकून पीककर्ज भरू पाहणाऱ्यांना सध्या पर्यायच राहलेला नाही. बाजारात कुणी पैसेही देण्यास तयार नाही. नाफेडला विक्री केलेल्या धान्याचे पैसे मिळालेले नाहीत. हातउसनवारीचे व्यवहार थांबलेले आहेत. अशा परिस्थितीत पीककर्ज कसे भरायचे हा पेच नियमित कर्ज भरणाऱ्यांना अधिक सतावू लागला. पीककर्ज वसुलीसाठी बॅंकांचे अधिकारी शेतकऱ्यांच्या उंबरठ्यावर जात आहेत. एकूणच सध्याची परिस्थिती शेतकऱ्यांची कसोटी पाहणारी ठरत आहे.

महत्त्वाची बातमी - अल्पवयीन मुलीस पळवून नेणारा अटकेत

मुदत वाढविण्याची गरज
शासनाने 31 मार्चपर्यंत पीककर्ज भरण्याची मुदत वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. शासनाने याची दखल घेऊन तातडीने आदेश काढले तर शेतकऱ्यांना फायदा होईल, असे
शेतकरी सांगत आहेत.

31 मार्चपुर्वी पीककर्ज भरण्याची शेतकऱ्यांना चिंता
मी मागील दहा वर्षांपासून नियमितपणे 31 मार्चच्या आत पीककर्जाचा भरणा करीत असतो. यंदा मात्र सध्याच्या परिस्थितीत पैशांची व्यवस्था करताना मोठी कसरत करावी लागत आहे. पैसा न भरता आल्यास थकीत कर्जदार म्हणून शिक्का बसण्याची शक्यता आहे. तसेच यंदा शासनाकडून नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50 हजारांचे अनुदान देण्याची घोषणा झालेली आहे. त्यापासूनही वंचित राहण्याची शक्यता आहे. माझ्या सारखे असंख्य शेतकरी अशा पेचात सध्या आहेत.
- संजय अघडते, रिधोरा ता. बाळापूर जि. अकोला

loading image