जिल्ह्यात 31 टक्के पेरण्या

file photo
file photo

नागपूर : आठवडाभरापासून होत असलेल्या पावसानंतर खरीप हंगामातील पेरणीला गती आली आहे. आतापर्यंत 31.66 टक्के पूर्ण झाल्या. मागील वर्षी याकाळात जवळपास शंभर टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. पेरणीला उशीर झाल्याने उत्पादनावर परिणाम होणार असल्याची भीती आहे.
जिल्ह्यात खरिपाचे एकूण 5 लाख 7 हजार 600 हेक्‍टर क्षेत्रावर नियोजन आहे. सर्वाधिक क्षेत्र हे कापसाचे आहे. 2 लाख 25 हजार हेक्‍टरवर कापूस होण्याचा अंदाज आहे. तर सोयाबीनचे 1 लाख हेक्‍टर व भाताचे 94 हजार 200 हेक्‍टर इतके असे क्षेत्र आहे. यंदा हवामान खात्याने सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला होता. परंतु, हा अंदाज चुकला. पावसाचे आगमन उशिराच झाले. मागील वर्षी काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. यातून धडा घेत शेतकऱ्यांनी यंदा सावध भूमिका घेतली आहे. पावसाचा अंदाज घेऊनच शेतकऱ्यांनी पेरण्या केल्यामुळे यंदा शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्‍यता तशी कमीच असल्याचे कृषी विभागाचे म्हणने आहे. 4 जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरी साधारणत: 224.91 मिलिमीटर इतका पाऊस पडत असतो. मात्र, यंदा 1 जून ते 4 जुलैपर्यंत केवळ 200.29 मि. मी. इतकाच पाऊस झाला. हा सरासरीच्या तुलनेत 11 टक्‍क्‍याने कमी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com