३२ हजार वीज कामगारांचा एल्गार

३२ हजार वीज कामगारांचा एल्गार

यवतमाळ - ‘समान काम, समान वेतन’ या मुख्य मागणीसह अन्य मागण्या कंत्राटी वीज कामगारांच्या आहेत. अजूनही या मागण्यांसंदर्भात निर्णय झालेला नाही. त्यामुळे उद्या (ता.२३ ) कंत्राटी वीज कामगारांनी बेमुदत संप पुकारला आहे. संपात राज्यातील जवळपास ३२ हजार कामगार सहभागी झालेले आहेत. मागण्यांवर लवकरच तोडगा न निघाल्यास येणाऱ्या दिवसांत वीजनिर्मितीवर संपाचा परिणाम होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या तीन कंपन्यांतील कंत्राटी वीज कामगारांच्या मागण्या प्रलंबित आहेत. त्यात समान काम, समान वेतन, आठ दहा वर्षांतील ज्येष्ठता यादी तयार करून ज्येष्ठ कंत्राटी कामगारांना कायम करणे, कंत्राटदार बदलले तरी कामगारांना कमी न करता त्यांनाच कामावर घेणे अशा मागण्या आहेत. यासंदर्भात आंदोलन केल्यानंतर मनोज रानडे समिती गठित करण्यात आलेली होती. समितीने शासनाला अहवाल दिला. 

परंतु, त्यावर चर्चा नाही. त्यानंतर  पुन्हा अनुराधा भाटिया समिती नेमण्यात आलेली आहे. त्यांना सहा मार्च २०१७ पर्यंत अहवाल सादर करावयाचा होता. मात्र, अजूनही अहवाल सादर झालेला नसल्याचा आरोप वीज कामगार कृती समितीने केला आहे. प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्‍ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, वीज कामगार महासंघ, तांत्रिक कामगार संघटना, भारतीय कामगार सेना (वीज युनिट), वीज कामगार पावर फ्रंट, इंटक, कोराडी, खापरखेडा, चंद्रपूर, भुसावळ, पारस या पावर स्टेशनमधील स्थानिक कामगार पाच संघटनांनी एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य वीज कामगार कृती समिती स्थापन करून आंदोलन सुरू केलेले आहे. एकाचवेळी राज्यातील विविध भागांतील ३२ हजार वीज कंत्राटी कामगार संपावर गेलेले आहे. यावर लवकर तोडगा न निघाल्यास वीजनिर्मितीवर परिणाम होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

कंत्राटी वीज कामगारांचा प्रश्‍न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यावर लवकर निर्णय होणे आवश्‍यक आहे. या प्रश्‍नांवर लवकर निर्णय न झाल्यास वीज कंपनीच्या तिन्ही कंपन्यांमधील कर्मचारी संपात सहभागी होतील.
- कृष्णा भोयर, सरचिटणीस, एमएसईबी वर्कर्स फेडरेशन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com