34 लाखांचा अवैध गुटखा पकडला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

मलकापूर : दसरखेड एमआयडीसी पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वरील मौजे रणथम परिसरातुन 34 लाख रुपयांचा गुटखा हस्तगत करीत एकूण 40 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कार्यवाही आज दुपारी साडेचारच्या सुमारास केली.

प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वर दुपारी नाकाबंदी करीत वाहनांची तपासणी सुरू केली दरम्यान एम एच 43 ई 8346 हा संपूर्ण ट्रक विमल गुटख्याच्या मालाने भरलेला आढळून आला, त्यामुळे पोलिसांनी विमल गुटख्यासह ट्रक चालक व वाहकाला ताब्यात घेतले या ट्रक मधून 34 लाख 20 हजार 400 रुपये किमतीचा 148 गोण्या विमल गुटखा व ट्रक किंमत 6 लाख रुपये असा एकूण 40 लाख 20 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करीत ट्रक चे चालक शे.रईस शे. इस्माईल वय 32, वाहक मुजुबखान मुक्तारखान वय 24 रा. मालेगाव जी. नाशिक या दोघांना ताब्यात घेतले. सदर कार्यवाही ही दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक माधवराव गरुड, कर्मचारी पहुरकर, बोराडे, निंबोळकर, रोकडे, माने व चालक राजपूत आदींनी पार पाडले.

Web Title: 34 lakhs of illegal gutka seized