नागपूर विभागात 35 टक्के विद्यार्थी मराठीत अनुत्तीर्ण

प्रभाकर कोळसे
सोमवार, 10 जून 2019

नंदोरी (वर्धा) : दहावीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. नवीन अभ्यासक्रम आणि कृतिपत्रिकांचे आव्हान व अंतर्गत तोंडी गुण बंद झाल्याने यंदा राज्याचा निकाल 77. 10 टक्‍के, तर नागपूर विभागाचा निकाल 67. 27 टक्‍के लागला. मागील वर्षी प्रमाणेच यंदाही नागपूर विभागाच्या निकालाने निच्चांक गाठला. नागपूर विभागात तर मातृभाषा प्रथम भाषा मराठीतच चक्क 35 टक्‍के विद्यार्थी नापास झालेत. मातृभाषेतच अनुत्तीर्ण होण्याची वेळ विद्यार्थ्यांवर का ओढवली, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

मातृभाषा मराठीतच विद्यार्थ्यांचा घात झाला. मराठीबहुल महाराष्ट्रात 22 टक्‍के विद्यार्थी मराठी विषयात अनुत्तीर्ण झाले आहेत. यावर चिंतन होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. नागपूर विभागात अनुक्रमे द्वितीय, तृतीय भाषा हिंदी, इंग्रजीमध्ये मराठी भाषेपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मराठी द्वितीय भाषेत 82.45 टक्के, तर हिंदी द्वितीय भाषा 75.60, इंग्रजी द्वितीय, तृतीय भाषेत 72. 43 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मराठीबहुल महाराष्ट्रातच मराठी दिवसेंदिवस कठीण आणि परकी तर होत नाही ना, असा प्रश्‍न या निकालावरून उपस्थित झाला आहे.

विभागीय मंडळ    मराठीचा निकाल    एकूण निकाल
नागपूर                65.30                 67.27
अमरावती            72.31                 71.98
पुणे                    83.79                 82.48
नाशिक                79.26                 77.58
औरंगाबाद            77.87                75.20
लातूर                  77.37                72.87
मुंबई                  76.16                77.04
कोकण                 90.08               88.38
कोल्हापूर              88.76                86.58
(मंडळनिहाय मराठी व एकूण निकालाची आकडेवारी.)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 35% of students fail in Marathi in Nagpur division