सावधान, अकोल्यातील ३५० घरं धोक्याची!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

जुने शहर अाणि मध्यवस्तीतील काही भागात अशा जुन्या आणि शिकस्त इमारतींची संख्या अधिक आहे. काही इमारतींना तर १०० वर्षांचा कालावधी उलटला आहे.

अकाेला - पावसाळ्याच्या ताेंडावर शहरातील शिकस्त इमारतीचा प्रश्न पून्हा एेरणीवर आला आहे. राहण्यासाठी धाेकादायक असलेल्या या इमारतींचा महापालिकेने सर्वे सुरू केला आहे. आतापर्यंत शहरात ३५२ धोकादायक इमारती आढळल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली. 

जुने शहर अाणि मध्यवस्तीतील काही भागात अशा जुन्या आणि शिकस्त इमारतींची संख्या अधिक आहे. काही इमारतींना तर १०० वर्षांचा कालावधी उलटला आहे. जुन्या बांधकामातील काही जुने वाडे देखील धाेकादायक स्थितीत आहेत. या इमारती राहण्यास अयाेग्य आहेत. वादळी पावसात अशा इमारतींची पडझड हाेऊन रहिवाशांच्या जिवीताचा प्रश्न निर्माण हाेऊ शकताे. या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाकडून पावसाळ्याच्या ताेंडावर इमारतींना नाेटीसेस बजावल्या जातात. सावधगिरी बाळगण्याच्या अनुषंगाने बजावण्यात आलेल्या या नाेटीसनंतर इमारतीमधील रहिवाशांनी पर्यायी विचार करणे आवश्यक असते. पण तसे हाेत नाही. जिवाचा धाेका पत्करुन हजाराे नागरिक अनेक वर्षापासून या शिकस्त इमारतींमध्ये राहत आहेत. यावर्षीच्या पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पून्हा एकदा या इमारतींचा प्रश्न एेरणीवर आला आहे. 

दुरुस्तीसाठी मुदत  -
इमारतीच्या दुरुस्तीसाठी आठवडाभराची मुदत दिली जाणार आहे. त्यानंतर ती इमारत स्वतः पाडावी लागेल किंवा मनपा प्रशासन कठाेर पावले उचलेल. त्यामुळे ईमारतीमधील रहिवाशांना स्थलांतरासाठी नियाेजन करून ठेवावे लागणार आहे.

सर्वे सुरु -
मनपा प्रशासनाने अशा ईमारतींचा सर्वे करण्यास सुरुवात केली आहे. सर्वे झाल्यानंतर या ईमारतींना नाेटीसेस बजावण्यात येतील. आठ,दहा दिवसातच सर्वेचा माहिती संकलीत हाेणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई करण्यास सुरुवात हाेईल.

गत वर्षीची स्थिती कायम -
मागील वर्षी सुमारे ३५० इमारती शिकस्त स्थितीत आढळून आल्या हाेत्या. संबंधित मालकांना नाेटीस बजावण्यात आल्या हाेत्या. त्यानंतर सुमारे २५ इमारतींची दुरुस्ती करण्यात आली हाेती. यावर्षीच्या सर्वेमध्ये यात पून्हा वाढ हाेण्याची शक्यता आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: 350 houses in Akola are danger