कीटकनाशक फवारणीतून हंगामात ३६ शेतकरी बाधित

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

यवतमाळ - कीटकनाशक फवारणीमुळे शेतकऱ्यांना विषबाधा होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेत जनजागृती केली जात आहे. यंदाही शेतकरी विषबाधित होत आहेत. आज तीन शेतकरी बाधित झाल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी फवारणी करताना सुरक्षाकिटचा वापर केला नव्हता. खरीप हंगामात पिकांची वाढ होत असतानाच त्यावर रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. ऑगस्टच्या दहा तारखेपर्यंत ही संख्या ३६ वर पोचली आहे.

Web Title: 36 Farmer poisoning by Insecticide