वर्धा जिल्ह्यात ३८ दृष्टिहीन झाले डोळस

रूपेश खैरी  
रविवार, 12 ऑगस्ट 2018

वर्धा - नेत्रदान सर्वश्रेष्ठ दान, मृत्यूनंतर आपल्या डोळ्यांनी दुसरा कुणी सृष्टी बघू शकतो, अशा जनजागृतीद्वारे राबविण्यात आलेल्या उपक्रमात वर्ध्यात मागील १६ महिन्यांमध्ये ३८ दृष्टिहीन डोळस झाले आहेत. त्यांना मिळालेल्या दृष्टीतून ते आता सृष्टीच्या सौंदर्याचा आनंद घेत आहेत. नेत्रप्रत्यारोपणामुळे त्यांचे अंधारलेले जीवन प्रकाशमान झाले. दुसरीकडे, जिल्ह्यातील तब्बल ३०५ दृष्टिहीन आयुष्यातील अंधार दूर होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.  

वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीने नेत्ररोपणाद्वारे दृष्टिहीनांच्या जीवनात उजेड आणणे शक्‍य झाले असले; तरी त्या तुलनेत नेत्रदान करणाऱ्यांची संख्या कमी आहे. एकट्या वर्धा जिल्ह्यात दीड महिन्यात ११४ बुबुळांचे संकलन करण्यात आले. यातील केवळ ३८ दात्यांचेच बुबुळ प्रत्यारोपणाच्या कामी आले आहेत. उर्वरित बुबुळ मात्र प्रत्यारोपण करण्यायोग्य नसल्याने ते विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकरिता ठेवण्यात आले. 

सरकारतर्फे नेत्रदान करण्याकरिता नागरिकांत जनजागृती अभियान राबविले जाते. असे असले तरी दान करणाऱ्यांची संख्या वाढत नसल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात दीड वर्षांत आतापर्यंत नेत्रदानाकरिता ३७६ जणांनी नोंदणी केली आहे. 

७५ बुबुळ ठरले निकामी 
जिल्ह्यात झालेल्या नेत्रदानातून एकूण ५७ जणांकडून नेत्रदान करण्यात आले. यातून ११४ बुबुळांचे संकलन झाले. पैकी ७५ बुबुळ प्रत्यारोपणाकरिता अयोग्य ठरले. मृत्यूपश्‍चात नेत्रदान करण्याकरिता झालेली दिरंगाई यास कारणीभूत ठरली. आता ही बुबुळे संशोधन कार्याकरिता कामी येत आहेत.

Web Title: 38 people are visually impaired in Wardha district