जलतरन तलाव, जीम, क्लब हाउससाठी 4 कोटींचा निधी

राजेश सोळंकी
मंगळवार, 19 जून 2018

आर्वी : आर्वी शहराचा विकास व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीद्वारे केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिलेला शब्द पाळला. आर्वीच्या नगरपालिका क्षेत्रात व्यायामशाळा, जलतरण तलाव, क्लब हाउससाठी नगरपालीकेला 7.28 कोटी रूपयांचा निधी मंजूर करत आर्वीकराना विकासाची संधी उपलब्ध करुन दिली आहे. 

नगरपालिका निवडणुकी दरम्यान फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळलेला असून यामुळे आर्वी तील प्रभाग 8, पांडुरंग वार्ड येथे प्रशासकीय इमारतीसह जलतरण तलाव, व्यायाम शाळा, क्लब हाउस निर्माण करण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे आर्वीची एक नविन ओळख निर्माण होणार आहे. येथे भाजपची एकहाथी सत्ता आल्यानंतर प्रकल्पाची रूपरेशा तयार करण्यासाठी दादारावजी केचे यांनी नगरपालीकेचे नगराध्यक्ष प्रा. प्रशांत सव्वालाखे व नगरसेवक यांना मार्गदर्शन केले. 

8 नोहेंबर 2017 च्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव समंत केला. 
यानंतर ठरावा समवेत दादारावजी केचे, प्रशांत सव्वालाखे यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे मागणी केली होती. आर्वीकरांचे आरोग्य सुदृढ़ राहावे या करीता या निर्माण कार्यामुळे नक्कीच फायदा होईल असे मत दादारावजी केचे यानी व्यक्त केले. 
आपण नगराध्यक्ष झाल्यापासून दादारावजी यांचे मार्गदर्शनात निधी कसा खेचुन आणायचा याचे प्रयत्न करीत असतो. 

मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रेम व त्यांचे स्विय सहायक सुमितजी वानखेडे यांना आपल्या गावाविषयी असलेली विशेष आत्मीयता या गोष्टीनी आपल्या शहरात कोट्यावधीचा निधी येतो आहे. त्या माध्यमातून जनतेची सेवा व शहर अजून सोईसुविधा युक्त करण्यासाठी हातभार लागत असल्याचे नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे म्हणाले.

Web Title: 4 crores fund for swimming pool, gym, club house