देवरीत ट्रक अपघातात चार ठार; एक गंभीर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 डिसेंबर 2018

देवरी (गोंदिया) : दोन ट्रकांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चारजण जागीच ठार तर, एक गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी (ता. 1) पहाटे साडेतीनच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील शिरपूरबांध येथील जैन पेट्रोलपंपाजवळ घडली. या घटनेत दोन्ही ट्रकांचा चेंदामेंदा झाला. 

रवी पितांबर यादव (वय 25), सरबन रामप्रसाद यादव (वय 34), विश्‍वेश्‍वर प्रेमलाल वर्मा (वय 30, सर्व रा. महरूमकला जि.राजनांदगाव छत्तीसगड), जावेद रमजानभाई आला (वय 24,रा. वाकानेर, जि. मोरबी, गुजरात) अशी मृतांची नावे आहेत. आसिफभाई नाथाभाई समा (वय 26 रा. उपलेटा, जि. राजकोट, गुजरात) हा अपघातात गंभीर जखमी झाला आहे. 

सी.जी. 04- जे. ए. 9902 क्रमांकाचा ट्रक नागपूरकडून रायपूरकडे जात होता तर, जी. जे. 03-ए. झेड. 8645 क्रमांकाचा ट्रक विरुद्ध दिशेने जैन पेट्रोलपंपावर डिझेल भरण्याकरिता जात होता. याचवेळी दोन्ही ट्रकांमध्ये समोरासमोर धडक झाली. यात सी.जी. 04-जे. ए. 9902 क्रमांकाच्या ट्रकमधील रवी यादव, सरबन यादव व विश्‍वेश्‍वर वर्मा तर, जी. जे. 03- ए. झेड 8645 क्रमांकाच्या ट्रकचा क्‍लीनर जावेद आला यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याच ट्रकचा चालक आसिफभाई नाथाभाई समा हा गंभीर जखमी झाला. त्याला देवरीच्या ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या घटनेत दोन्ही ट्रकांचा पूर्णतः चेंदामेंदा झाला आहे. पुढील तपास देवरी पोलिस करीत आहेत.

Web Title: 4 dies and 1 injured in accident of truck