वेगळ्या विदर्भासाठी 4 जुलैला नागपूर बंदची हाक

श्रीधर ढगे
मंगळवार, 19 जून 2018

खामगाव (बुलडाणा) : विदर्भ राज्य आंदोलन समितीने वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी  नागपूर येथे 4 जुलैला होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाचा निषेध करण्याचे आवाहन केले असून त्या दिवशी नागपूर बंद ठेवून सरकारचा निषेध केला जाणार असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

यासंदर्भात विदर्भ राज्य आंदोलन समितीचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष कैलास फाटे म्हणाले की,  देवेंद्र फडणवीस तसेच भाजप पक्षाने निवडणूकीत विदर्भावर झालेल्या अन्याया विरोधात अनेक वल्गना केल्या, वेगळ्या विदर्भाच्या आश्वासनावर विदर्भात पुर्ण बहुमत मिळविले. परंतु सरकार स्थापन केल्यानंतर विदर्भाबाबत काहीच भूमिका घेतली नाही. भाजपाने जनतेची फसवणूक केली आहे. या सरकार विरोधात जावून वेगळे विदर्भ राज्य मागण्यासाठी आता व्यापक आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाच्या तयारी करिता विदर्भ जन आंदोलन समितीचे संस्थापक अध्यक्ष ऍड वामनराव चटप यांच्या नेतृत्वात विदर्भातील कार्यकर्ते व जनतेचा पाठिंबा घेतला जात आहे.

येत्या 21 जून  रोजी खामगाव येथील विश्राम गृहावर  सकाळी 11 वाजता बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकी करीता विदर्भ प्रेमींनी व वेगळ्या विदर्भाबाबत शंका कुशंका असणाऱ्यांनी निस्पक्ष भावनेने हजर राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष तथा राज्य कोअर कमिटी सदस्य कैलास फाटे खामगाव, ऍड सुरेश वानखडे मेहकर, संपर्क प्रमुख तेजराव पाटील मुंढे, समन्वयक दामोदरजी शर्मा मलकापूर, नामदेवराव जाधव बुलढाणा, रामेशसिंग चव्हाण खामगाव,  डिगंबर चिंचोले यांनी केले आहे.

Web Title: on 4 july strike for demand of separate vidarbha