नागपूर जिल्ह्यातील 4 लाख 58 हजार मतदार वाढले

नीलेश डोये
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

नागपूर  : सर्वच मतदारसंघात लाखावर मतदारांच्या संख्येत भर पडली असताना उमरेड विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत फक्त 383 मतदारांची वाढ झाली. त्यामुळे या मतदारसंघातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केले काय, असाच सवाल उपस्थित होत आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील बारा मतदारसंघात एकूण 4 लाख 58 हजार 715 मतदार वाढले आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर झाला असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अधिसूचनाही काढण्यात आली. 21 ऑक्‍टोबरला मतदान होणार असून, 24 तारखेला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीकरिता वर्षभर मतदार नोंदणीचा कार्यक्रम राबविण्यात येते. 2014 च्या लोकसभेच्या तुलनेत 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांच्या संख्येत तीन लाखांवर भर पडली. वर्ष 2014 च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदार संख्या 37 लाख 3 हजार 652 होती. तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 31 ऑगस्ट 2019 नुकसान जिल्ह्याची मतदार संख्या 41 लाख 63 हजार 367 आहे. 4 लाख 58 हजार 715 मतदारांची संख्या वाढली आहे. हिंगणा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 72 हजार 843 मतदारांची वाढ झाली. तर उमरेड मतदारसंघात फक्त 383 मतदारांची वाढ दर्शविण्यात आली आहे. प्रत्येक मतदारसंघात 20 हजारांपेक्षा जास्त मतदारांची वाढ झाली असताना उमरेड मतदारसंघात फक्त 382 मतदारांची वाढ दर्शविण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4 lakh 58 thousand voters increased in Nagpur district