40 कर्मचाऱ्यांना पदोन्नती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 डिसेंबर 2016

नागपूर - जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य विभागाच्या 40 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. यासंबंधीचे आदेश जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आज (ता.20) जाहीर केले.

नागपूर - जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य विभागाच्या 40 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. यासंबंधीचे आदेश जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आज (ता.20) जाहीर केले.

पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांत शिक्षण विभागाच्या 8 उच्च श्रेणी शिक्षकांची मुख्याध्यापकपदावर पदोन्नती करण्यात आली. यात एस. एम. मुसळे, व्ही. एम. नवघरे, एस. बी. पारखी, एस. के. काळबांडे, सी. आर. तांबे, अलका सोनवणे, एस. जी. विठाळकर, एस. एस. लांबट यांचा समावेश आहे. तसेच आरोग्य विभागाच्या 20 आरोग्यसेवक (महिला) व 12 आरोग्य सहायक (पुरुष) अशा 32 कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली. पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत वाढ होणार आहे. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची पदोन्नती आणि रिक्तपदासंदर्भात कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने निवेदन देऊन शासनाने प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.
 
Web Title: 40 employees promoted