गोंदियातून 42 हजारांचा गांजा जप्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

गोंदिया : शक्ती चौकातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरून 42 हजार रुपये किमतीचा गांजा रामनगर पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (ता. 23) करण्यात आली. या प्रकरणी भरत गंगाधर पात्रो (वय 28) व अजित सुकु भोई (वय 20, दोघेही, रा. पाईमल, ओडिसा) यांना अटक करण्यात आली.

भरत पात्रो व अजित भोई यांच्याजवळ ओलसर गांजा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठले. दोघांचीही कसून चौकशी केली. या वेळी त्यांच्या ताब्यात असलेला 42 हजार रुपये किमतीचा ओला गांजा तसेच 5 हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त केला. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र कुंभार यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत दोघांनाही अटक केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 42 thousand Ganja seized from Gondia