कचरा वेचणाऱ्या 44 जणांत कर्करोगाची लक्षणे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

नागपूर : संपूर्ण नागपूरचा कचरा जिथे टाकला जातो त्या भांडेवाडी डम्पिंग स्टेशनमधील कचऱ्यावर अनेकांचे घर चालते. कचऱ्यातून मिळणारे प्लास्टिक, रद्दी पेपर भंगारात विकून ते आपला उदरनिर्वाह करतात. यातील 128 महिला, पुरुष, तरुण आणि बालकांची तपासणी केली असता 44 जणांमध्ये मुखपूर्व कर्करोगाची लक्षणे आढळली. धक्कादायक म्हणजे, यांना आपण कॅन्सरच्या विळख्यात असल्याची पुसटशी कल्पनाही नव्हती.

जाहिरातीचा प्रभाव, संगतीचा परिणाम, सहजपणे उपलब्ध होणारे तंबाखूजन्य पदार्थ आणि एकदा चव घेण्याचा मोह आदी कारणांमुळे तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनाचे प्रमाण वाढत आहे. घाणीतले काम करायचे आहे तर व्यसन तर असतेच, अशी मानसिकता असल्याने याच विचारातून बहुसंख्य कचरा वेचणारे व्यसनाधीन झाले आहेत. यात पुरुषांसह महिला व बालकांचाही समावेश आहे. याची माहिती शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर यांना मिळताच त्यांनी या भागात मुख तपासणी शिबिर घेण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयातील सामाजिक दंत शास्त्र विभागाच्या वतीने भांडेवाडी येथे विभागाचे प्रमुख डॉ. सचिन खत्री व डॉ. रोहित शिंघाई यांच्या नेतृत्वात चार व सहा ऑगस्ट असे दोन दिवस शिबिर घेण्यात आले. यात 128 लोकांची तपासणी करण्यात आली. यातील 82 टक्‍के म्हणजे 105 जण तंबाखू व्यसनाचा आहारी गेल्याचे आढळले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 44 Cancer Symptoms