४४० सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

नागपूर - राज्य पोलिस दलातील ४४० सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांची यादी आज गृहमंत्रालयाने जाहीर केली. यामध्ये नागपूरच्या ३९ सहायक पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या एपीआय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे नागपूर गुन्हे शाखेला पुन्हा नव्याने मोट बांधावी लागणार आहे.

गुन्हे शाखेचे कर्तबगार पोलिस अधिकारी जितेंद्र बोबडे आणि ज्ञानेश्‍वर भेदोडकर या दोन्ही अधिकाऱ्यांना शासकीय कारणास्तव एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र उर्वरित ३९ सहायक पोलिस निरीक्षकांची राज्यात इतरत्र बदली करण्यात आली आहे. यामध्ये गुन्हे शाखेचे विक्रांत सगणे, प्रदीप अतुलकर, प्रभाकर शिऊरकर, राहुल सूर्यतळ, कमलाकर गड्‌डीमे, नितीन पगार, धर्मेंद्र आवारे यांची बदली करण्यात आली. तसेच एपीआय गोकुळ सूर्यवंशी, संदीप धोबे, विनोद कडलक, सचिन लुले पाटील, नम्रता जाधव, सोनू झामरे, मंदार पुरी यांचीही बदली झाली आहे.

३२ एपीआय येणार 
नागपूर शहर आयुक्‍तालयातून ४० सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. तर अन्य जिल्ह्यातून ३२ सहायक पोलिस निरीक्षकांच्या नागपूर आयुक्‍तालयात बदल्या झाल्या आहेत. मात्र, गुन्हे शाखेतील आठ कर्तव्यदक्ष अधिकारी गेल्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे आव्हान असणार आहे.

Web Title: 440 police officer transfer