अहेरी तालुक्‍यात ४६ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

दुसरा टप्पा २१ फेब्रुवारीला : ५९ हजार ९३६ मतदान बजावणार मतदानाचा हक्‍क
अहेरी - अहेरी, सिरोंचा एटापल्ली व भामरागड पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यात २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. अहेरी तालुक्‍यात ५९ हजार ९३६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून यामध्ये ३० हजार २४४ पुरुष, तर २९ हजार ६९२ महिला मतदारांचा समावेश आहे. तालुक्‍यात ४६ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील, तर ३६ मतदान केंद्रे संवेदनशील आणि २५ मतदान केंद्रे साधारण आहे.

दुसरा टप्पा २१ फेब्रुवारीला : ५९ हजार ९३६ मतदान बजावणार मतदानाचा हक्‍क
अहेरी - अहेरी, सिरोंचा एटापल्ली व भामरागड पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यात २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. अहेरी तालुक्‍यात ५९ हजार ९३६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून यामध्ये ३० हजार २४४ पुरुष, तर २९ हजार ६९२ महिला मतदारांचा समावेश आहे. तालुक्‍यात ४६ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील, तर ३६ मतदान केंद्रे संवेदनशील आणि २५ मतदान केंद्रे साधारण आहे.

अहेरी तालुक्‍यात एकूण सहा जिल्हा परिषद क्षेत्र आहेत. यामध्ये खमनचेरू-नागेपल्ली, वेलगूर-आलापल्ली, महागाव (बू.) -देवलमरी, पेरमिली-राजाराम, रेपनपल्ली-उमानूर व जिमलगट्टा-पेठा या जिल्हा परिषद क्षेत्रांचा समावेश आहे. तालुक्‍यातील खमनचेरू पंचायत समिती गणातून २ हजार ७५७ पुरुष व २ हजार ६९९ महिला, असे एकूण ५ हजार ५६ मतदार आहेत.

नागेपल्ली पंचायत समिती गणातून २ हजार ७३३ पुरुष व २ हजार ६३८ महिला, असे ५  हजार ३७१ मतदार आहेत. वेलगुर-आलापल्ली जिल्हा परिषद क्षेत्रात वेलगुर पंचायत समिती गणात ३ हजार २२५ पुरुष व ३ हजार १०८ महिला, असे एकूण ६ हजार ३३३ मतदार आहेत. आलापल्ली पंचायत समिती गणात ३ हजार ३६५ पुरुष तर ३ हजार ५६६ महिला मतदार आहेत. महागाव बू.-देवलमरी जिल्हा परिषद क्षेत्रात महागाव बू. पंचायत समिती गणात २ हजार ३२९ पुरुष व २ हजार ३६८ महिला, असे ४ हजार ६९७ मतदार आहेत.

देवलमरी पंचायत समिती गणात २ हजार ७५७ पुरुष व २ हजार ७२५, असे एकूण ५ हजार ४८२ मतदार आहेत. पेरमिली-राजाराम जिल्हा परिषद क्षेत्रात पेरमिली पंचायत समिती गणात २ हजार २६० पुरुष व २ हजार २१४ महिला, असे एकूण ४ हजार ४७४ मतदार आहेत, तर राजाराम पंचायत समिती गणात २ हजार १३७ पुरुष व १ हजार ९६९ असे एकूण ४ हजार १०६ मतदार आहेत. रेपनपल्ली-उमानूर जिल्हा परिषद क्षेत्रात रेपनपल्ली पंचायत समिती गणात २ हजार ३२६ पुरुष व २ हजार १९४ महिला उममेदवार आहेत.

या क्षेत्रात एकूण ४ हजार ५२० मतदार आहेत. उमानूर पंचायत समिती गणातून २ हजार १३३ पुरुष, तर २  हजार ७१ महिला असे एकूण ४ हजार २०४ मतदार आहेत.  जिमलगट्टा-पेठा जिल्हा परिषद क्षेत्रात जिमलगट्टा पंचायत समिती गणात १ हजार ९४० पुरुष, तर १ हजार ८८७ महिला मतदार आहेत. एकूण ३ हजार ८२७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पेठा पंचायत समिती गणात २ हजार २८२ पुरुष व २ हजार २५३ महिला असे एकूण ४ हजार ५३५ मतदार आहेत.

तीन आत्रामांची प्रतिष्ठानाला
अहेरी विधानसभा क्षेत्रात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम तसेच आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते दीपक आत्राम यांची कसोटी लागणार आहे. या विधानसभा क्षेत्रातील मतदान दुसऱ्या टप्प्यात घेण्यात येणार आहे. त्यादृष्टीने उमेदवारांची चाचपणी सुरू झाली. मात्र, पालकमंत्र्यांचा अद्याप पत्ता नसल्याने भाजप व नाविसचे कार्यकर्ते सभ्रमात आहेत. गेल्या काही वर्षांत या भागात विकासकामांकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, रस्ते, पाणी,  आरोग्य तसेच रोजगार या प्रमुख समस्या असून याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने येत्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान राजकीय नेत्यांना नागरिकांच्या संतापाला सामोर जावे लागणार आहे.

Web Title: 46 polling stations sensitive in aheri tahsil