वाळू वाहतूक करणारे 47 ट्रक जप्त 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

नागपूर - जिल्ह्यात घाटांवरून अवैधपणे वाळूची वाहतूक सुरूच आहे. यावर आळा घालण्यासाठी उपयोगात आणण्यात येत असलेला ड्रोनही कुचकामी ठरत आहे. आज जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या अभियानात 47 ट्रक जप्त करून 6 लाख 19 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या कारवाईत महसूल व खनिज विभागाच्या चमूने जिल्हाभरातील सर्व 13 तालुक्‍यांमध्ये कारवाई केली. तर, 47 ट्रक जप्त करून दंड वसूल केला. याप्रकरणी 1 गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात अवैध उत्खनन व खनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी शुक्रवारी ऍन्टी मायनिंग डे साजरा करण्यात आला. जिल्हाभरात करण्यात आलेल्या कारवाईत पालकमंत्र्यांचे क्षेत्र कामठी तालुक्‍यात सर्वाधिक प्रकरणे उघडकीस आली. 

आतापर्यंत 179 अटकेत 
वाळूघाट व इतर गौण खनिज खदानींचा लिलाव झाल्यानंतर चालू आर्थिक वर्षात जिल्ह्याभरात बऱ्याच कारवाया करण्यात आल्या. विशेष म्हणजे 15 जानेवारीपर्यंत 618 प्रकरणे उघडकीस आली. त्यात 2.81 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. शिवाय 96 प्रकरणांत गुन्हा दाखल करण्यात आला असून 179 जणांना अटक करण्यात आली.

Web Title: 47 trucks seized

टॅग्स