नुकसान भरपाईपासून 49 हजार शेतकरी वंचित 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

अकोला - अकोला जिल्ह्यातील 48 हजार 666 बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी मदतीचे वाटप करण्यासाठी 45 कोटी रुपयांची आवश्‍यकता आहे. तिसऱ्या हप्त्याची रक्कम मिळाली नसल्याने शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारबद्दल असंतोष वाढत आहे. 

गेल्या वर्षातील खरीप हंगामामध्ये बीटी कापसाच्या उभ्या पिकावर गुलाबी बोंड अळीने आक्रमण केल्यानंतर जिल्ह्यातील सुमारे दीड लाख हेक्‍टर क्षेत्रावरील कापसाचे 33 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नुकसान झाले होते. "एनडीआरएफ'च्या निकषांप्रमाणे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने 135 कोटी 51 लाख 74 हजार 339 रुपयांची मागणी केली होती. पहिल्या व दुसऱ्या हप्त्याची रक्कम मिळाल्यानंतर जिल्ह्यातील सातही तहसीलदारांनी 15 ऑगस्टपर्यंत 99.83 टक्के मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली; परंतु तिसऱ्या हप्त्याचा निधी मिळाला नसल्याने 48 हजार 666 शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.

Web Title: 49 thousand farmers deprived of losses