स्फोटातील पाचही जखमींचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

कळमना - येथील स्वागतनगरात एका घरात सिलिंडर स्फोट झाल्याने पाच जण गंभीर जखमी झाले होते. पाचपैकी दोघांचा घटनेच्या दिवशीच मृत्यू झाला होता तर उर्वरित चौघांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. ही दुर्दैवी घटना गुरुवारी (ता. १९) रात्री साडेआठ वाजता कळमन्यातील स्वागतनगरात घडली होती. 

दत्तू लक्ष्मण गुरकुंडे (वय ७०, स्वागतनगर), प्रकाश दत्तू गुरकुंडे (वय ४१), हेमराज विठोबाजी पडोळे (वय ३०, स्वागतनगर), कुलदीप बंडू सेलोटे (वय ३०, भिवापूर), रोशन उके अशी मृतांची नावे आहेत. प्रकाश गुरकुंडे ऑइल टॅंकरवर चालक होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी जवळपास १५ लिटरची डिझेलची डबकी (कॅन) घरात आणून ठेवली होती. गुरुवारी सायंकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास प्रकाश आणि त्यांचे तीन मित्र घरात बसले होते. प्रकाश यांचे वडील दत्तू गुरकुंडे घरात टीव्ही पाहत होते. 

दरम्यान, इन्व्हर्टरमध्ये शॉर्टसर्किट झाला. त्यामुळे डिझेलच्या डबकीचा आणि नंतर सिलिंडरचा स्फोट होऊन पाचही जण गंभीर जखमी झाले होते. दत्तू गुरकुंडे आणि कुलदीप सेलोटे यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तिघांवर मेयोत उपचार सुरू होते. रोशन उकेचा उपचारादरम्यान तिसऱ्या दिवशी तर हेमराज पडोळे (वय ३०, स्वागतनगर) यांचा सोमवारी मृत्यू झाला.

बाप-लेकाचा मृत्‍यू  
गुरकुंडे यांच्या घरातील कर्ते दोन्ही पुरुष मरण पावल्यामुळे संसार मोडकळीस आला आहे. वडील दत्तू गुरकुंडे यांचे घटनेच्या दिवशीच दगावले. तर प्रकाश यांच्यावर उपचार सुरू होता. मात्र, उपचारादरम्यान प्रकाश यांचाही मृत्यू झाला. घरातील कमावते व्यक्‍ती गमावल्याने कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.

Web Title: 5 death in cylinder blast

टॅग्स