पाच जहाल माओवाद्यांची शरणागती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

गडचिरोली : नक्षल चळवळीतील पाच जहाल माओवाद्यांनी गडचिरोली पोलिसांपुढे शरणागती पत्करली. विशेष म्हणजे, यातील दोघांवर प्रत्येकी चार लाख, तर उर्वरित तिघांवर प्रत्येक दोन लाख, असे एकूण 14 लाख रुपयांचे बक्षीस होते. तसेच या पाचपैकी एक माओवादी छत्तीसगड राज्यातील आहे.

गडचिरोली : नक्षल चळवळीतील पाच जहाल माओवाद्यांनी गडचिरोली पोलिसांपुढे शरणागती पत्करली. विशेष म्हणजे, यातील दोघांवर प्रत्येकी चार लाख, तर उर्वरित तिघांवर प्रत्येक दोन लाख, असे एकूण 14 लाख रुपयांचे बक्षीस होते. तसेच या पाचपैकी एक माओवादी छत्तीसगड राज्यातील आहे.

पोलिसांपुढे शरणागती पत्करणाऱ्यांमध्ये दिनेश ऊर्फ शांताराम सनकू मडावी (वय 25, रा. बोधीन, ता. धानोरा), मंगेश ऊर्फ राजू येर्रा मडावी (वय 24, रा. पालेकसा, ता. अहेरी), सविता ऊर्फ अस्मिता बाजू तुमरेटी (वय 21, रा. मोरावाही, ता. एटापल्ली), वसंत ऊर्फ रैजीराम पाठीराम वड्डे (वय 23, रा. तिरलागड, ता. पाखांजूर, जि. कांकेर, छत्तीसगड), रवी ऊर्फ नंदू रामसू गोटा (वय 25, रा. कोंदावाही, ता. एटापल्ली) यांचा समावेश आहे.
दिनेश ऊर्फ शांताराम सनकू मडावी 2008 पासून नक्षल संघटनेची कामे करत होता. नंतर तो कसनसूर प्लाटूनचा सदस्य झाला. मंडोली रिठ, पेंदुलवाही, कारका, भस्मनटोला आदी चकमकीत त्याचा सहभाग होता. त्याच्यावर चार लाख रुपयांचे बक्षीस होते. वसंत वड्डे 2010 मध्ये प्लाटून क्रमांक तीनमध्ये दाखल झाला.

ताडगुडा, झुरी नाला चकमकीत त्याचा सहभाग होता. त्याच्यावरही चार लाखांचे बक्षीस होते. दिनेश मडावी 2006 मध्ये जनमिलीशीया दलममध्ये दाखल झाला. पद्दूर, खोब्रामेंढा पहाडी आदी चमकमीत त्याचा सहभाग होता. त्याच्यावर दोन लाख रुपयांचे बक्षीस होते. मंगेश मडावी 2010 पासून अहेरी नक्षल्यांचे काम करत होता. आशा, नैनगुडा, कुंजेमरका, नेलगुंडा आदी चकमकीत त्याचा सहभाग असून, त्याच्यावर दोन लाखांचे बक्षीस होते. सविता तुमरेटी 2011 मध्ये अल्पवयातच दलममध्ये दाखल झाली. गडदापल्ली, हिदूर, पेंदुलवाही आदी चकमकीत तिचा सहभाग होता. तिच्यावरही दोन लाखांचे बक्षीस होते.

Web Title: 5 maoists surrender

टॅग्स