पाच पोलिस निरीक्षकांसह चार सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या!

police
police

अकोला : जिल्ह्यात मागील काही दिवसापासून बदल्यांचे वारे वाहने सुरू अाहेत. यातच गुरुवारी (ता. 13) जिल्हा पोलिस अधीक्षकांनी प्रशासकीय तथा विनंतीवरून पाच पोलिस निरीक्षक तर चार सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या केल्या असून, चार सहाय्यक पोलिस निरीक्षकांना पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती देण्यात अाली अाहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राकेश कलासागर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील पाच पोलिस निरीक्षकांसह चार सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्याचे अादेश निर्गमीत केले. यामध्ये बोरगावमंजूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजीव महादेव राऊत यांची नियंत्रण कक्षात तर वाहतूक शाखेचे प्रभारी पोलिस निरीक्षक विलास पाटील यांची खदान पोलिस ठाण्यात, खदान पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हरीश गवळी यांची बोरगावमंजू पोलिस ठाण्यात तर डाबकी रोड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनिल सोळंके यांची जिल्हा विशेष शाखेत बदली करण्यात अाली अाहे. तर जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक देवराव खंडेराव यांची डाबकी रोड पोलिस ठाण्यात बदली करण्यात अाली अाहे.

यासोबतच स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण यांची पिंजर पोलिस ठाण्याच्या ठाणेदार पदी नियुक्ती केली अाहे. तर स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण हे एमअायडीसी पोलिस ठाण्याचा ठाणेदार पदाचा पदभार सांभाळणार अाहेत. याचसोबत डाबकी रोड पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय खंडारे यांची बदली माना पोलिस ठाण्याच्या ठाणेदारपदी झाली अाहे. तर नियंत्रण कक्षातील सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर सुदाम वानखेडेंची डाबकी रोड पोलिस ठाण्यात बदली करण्यात अाली अाहे. 

चार सहाय्यक पोलिस निरीक्षकाना पदोन्नती
बदल्याप्रमाणेच जिल्हा पोलिस अधीक्षकांनी जिल्ह्यातील चार सहाय्यक पोलिस निरीक्षकांची पोलिस निरीक्षक पदी पदोन्नती झाल्याचे अादेश निर्गमीत केले अाहेत. यामध्ये एमअायडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर शेळके यांची अमरावती शहर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक पदी पदोन्नती देण्यात अाली अाहे. तर बाळापूर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव पाटील यांची पोलिस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे पोलिस निरीक्षकपदी, सायबर सेलच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सीमा म. दाताळकर यांची अमरावती शहर पोलिस ठाण्यात तर माना पोलिस ठाण्याचे भाऊराव घुगे यांची पोलिस प्रशिक्षण केंद्रात पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती करण्यात अाली अाहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com