50 किलोमीटरचा प्रवास, 500 रुपये खर्च !

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

उमरेड (जि.नागपूर ) : ग्रामीण भागातील जनतेला आधार कार्ड काढण्यासाठी पन्नास पन्नास किलोमीटरचा प्रवास करून जावे लागते आणि त्यासाठी त्यांना 200 ते 500 रुपये खर्च येतो. याशिवाय रोजमजुरी करणाऱ्या शेतमजुरांना आधार कार्डसाठी अख्खा दिवस घालवावा लागतो. त्यामुळे त्यांची मजुरीही जाते म्हणून ग्रामीण भागातील जनतेसाठी प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये आधार कार्ड केंद्र शिबिराचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. उमरेड तालुक्‍यात तहसील कार्यालय उमरेड येथे नुकतेच आधार कार्ड केंद्र सुरू झाले असून याव्यतिरिक्त नांद आणि भिवापूर या ठिकाणी आधार कार्ड बनविण्यासाठी नागरिकांना जावे लागते.

उमरेड (जि.नागपूर ) : ग्रामीण भागातील जनतेला आधार कार्ड काढण्यासाठी पन्नास पन्नास किलोमीटरचा प्रवास करून जावे लागते आणि त्यासाठी त्यांना 200 ते 500 रुपये खर्च येतो. याशिवाय रोजमजुरी करणाऱ्या शेतमजुरांना आधार कार्डसाठी अख्खा दिवस घालवावा लागतो. त्यामुळे त्यांची मजुरीही जाते म्हणून ग्रामीण भागातील जनतेसाठी प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये आधार कार्ड केंद्र शिबिराचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. उमरेड तालुक्‍यात तहसील कार्यालय उमरेड येथे नुकतेच आधार कार्ड केंद्र सुरू झाले असून याव्यतिरिक्त नांद आणि भिवापूर या ठिकाणी आधार कार्ड बनविण्यासाठी नागरिकांना जावे लागते. ग्रामीण भागातील जनतेचा विचार करता संबंधित विभागाने प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आधार कार्ड शिबिराचे आयोजन करावे, अशी नागरिकांची मागणी आहे. सद्यःस्थितीत बॅंकेशी निगडित किंवा कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आधार नंबर बॅंकेशी लिंक असावा, मोबाईल नंबरसोबत "लिंक' असावा, अन्यथा जनता शासकीय योजनेपासून वंचित राहते आणि बोटावर मोजण्याइतक्‍या आधार कार्ड केंद्रांवर जनता गेली असता त्यांना असुविधेला सामोरे जावे लागते. आधार कार्ड केंद्रचालक त्यांच्या गरजेचा फायदा घेत त्यांच्याकडून जादा पैशाची आकारणी करतात. नाइलाजास्तव नागरिकांना जादा पैसे मोजावे लागतात. इतके करूनसुद्धा आधार कार्ड तयार करताना अनेक त्रुटी येतात. कुणाची नावे बदलतात, कोणाचे छायाचित्र बदलतात तर कुणाचा पत्ता बदलतो. अदलाबदली मोठ्‌या प्रमाणात झालेली पाहायला मिळते. म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जर आधार कार्ड केंद्र शिबिर सुरू केले तर केंद्रचालकांचा कामाचा व्याप कमी होईल आणि सहजरित्या अचूकपणे आधार कार्ड तयारही करता येईल. म्हणून शासनाने याकडे लक्षपूर्वक विचार करावा. 

शासनाच्या जवळपास सर्वच योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आधारकार्ड अतिमहत्वाचे असते. विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागातील जनतेला सहजरीत्या आधार कार्ड मिळतील यासाठी ग्रामपंचायत स्तरावर आधार कार्ड केंद्रांच्या शिबिराचे आयोजन करण्यात यावे. त्याने जनतेचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल. 
राजू मेश्राम 
उमरेड विधानसभा प्रभारी 
भारिप बहुजन महासंघ (वंचित बहुजन आघाडी ) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 50 km journey, 500 rupees spent!