Maharashtra vidhansabha 2019 : 50 लाखांचा दारू साठा जप्त 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

नागपूर : उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारूविक्रीविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. 12 दिवसांत 50 लाखांचा दारूसाठा जप्त करून 181 आरोपींना अटक केली आहे. 
निवडणूक काळात दारूचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. मतदारांना प्रलोभन देण्यासाठी याचा उपयोग करण्यात येते. अनेकदा हे समोर आले आहे. निवडणूक काळात अवैध दारूविक्रीवर आळा घालण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून विशेष प्लान तयार करण्यात आला आहे. यासाठी विभागाकडून अतिरिक्त मनुष्यबळाचीही मागणी करण्यात आली आहे. अवैध दारू तयार होणाऱ्या क्षेत्रांचीही यादी तयार केली असून, येथे लक्ष्य केंद्रित करण्यात आले आहे. 

अवैध दारूविक्री करणाऱ्या ठिकाणी धाड सत्र सुरू करण्यात आले आहे. यासाठी पोलिस विभागाचीही मदत घेण्यात येत आहे. आचारसंहिता लागल्यापासून दोन ऑक्‍टोबरपर्यंत 176 ठिकाणी उत्पादन शुल्क विभागाकडून धाडी घालण्यात आल्या. यात 142 प्रकरणांत 181 आरोपींना अटक करण्यात आली. 50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात पाच हजार 586 लिटर हातभट्टी, 67 हजार 560 लिटर रसायन, 518 लिटर देशी दारू, 50 लिटर विदेशी दारू, 8 लिटर बिअर, 35 लिटर स्पीरिटचा समावेश आहे. याचसोबत 12 वाहनेही जप्त करण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 50 lakhs worth of liquor seized