सिटी बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थ्यांना 50 टक्के सवलत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

मनपातर्फे शहरातील सर्वच मार्गावर बस वाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे. सदर बस मनपा प्रशासनाच्या नावावर असून बससेवा चालविण्यासाठी मनपाला कोणताही खर्च न करता 5 टक्के रॉयल्टी मिळणार आहे. मनपाने सामाजिक दायित्वातून ही सवलत जाहीर केली आहे.

अकोला : अकोला शहर बस वाहतूक सेवेत शहरातील ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांना 50 टक्के सूट देण्याचा निर्णय शहर बस संस्थाचालकांनी भेटला आहे. या योजनेचा लाभ त्यांनी घ्यावा असे आवाहन सुद्धा महानगरपालिका प्रशासनाने केले आले.

मनपातर्फे शहरातील सर्वच मार्गावर बस वाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे. सदर बस मनपा प्रशासनाच्या नावावर असून बससेवा चालविण्यासाठी मनपाला कोणताही खर्च न करता 5 टक्के रॉयल्टी मिळणार आहे. मनपाने सामाजिक दायित्वातून ही सवलत जाहीर केली आहे.

Web Title: 50 percent discount for students with senior citizens in City Bus