Vidhan Sabha 2019 : भंडारा जिल्ह्यात तीन वाजेपर्यंत 50 टक्के मतदान

File photo
File photo

भंडारा : विधानसभेच्या भंडारा, तुमसर व साकोली या तीन मतदारसंघासाठी दुपारी तीन वाजेपर्यंत 50.56 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत 31.54 टक्के मतदान झाले होते. यात तुमसर मतदारसंघात 31.45 टक्के, भंडारा 27.20 टक्के व साकोली मतदारसंघात 33 टक्के मतदान झाले होते. यानंतर मतदानासाठी नागरिक घराबाहेर पडल्याने टक्केवारी वाढली.
तुमसर तालुक्‍यातील सितेपार येथील केंद्रावरील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड आल्याने काही काळ मतदान प्रक्रिया ठप्प झाली होती. प्रशासनाने ईव्हीएम बदलविल्यानंतर मतदानाला पूर्ववत सुरूवात झाली. लाखनी तालुक्‍यातील रेंगेपार, धाबेटेकडी, इसापूर आदी आठ मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड आला होता. लाखांदूर तालुक्‍यातील मुरमाडी, साखरा, बोथली येथे ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड आल्याने एक तास मतदान थांबले होते. तुरळक घटना वगळता जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात शांततेत मतदान सुरू आहे.
दिव्यांग मतदारांसाठी आवश्‍यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने या मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजाविला. शहरासह अनेक भागातील मतदारांचे नाव यादीत नसल्याने अशा मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागत आहे. तर, काही मतदारांचे नाव इतरत्र केंद्रावर असल्याने मतदारांची तारांबळ उडाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com