कुपाेषणाचे दुष्टचक्र, पाचशेवर बालके कुपाेषित

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

अकाेला : कुपोषणाला आळा घालण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहे. मात्र यानंतरही कुपोषणाला प्रतिबंध लावण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. मार्च महिन्यात जिल्ह्यात ५३८ बालके कुपाेषित आढळली. त्यामध्ये ८४ बालके ही अति तीव्र तर ४५४ बालके ही मध्यम तीव्र कुपाेषित आढळली आहेत. जिल्ह्यात प्रत्येक महिन्यात कुपाेषित बालकांची संख्या पाचशेच्यावरच राहत असल्यामुळे कुपोषणाची समस्या गंभीर होत असल्याचे चित्र आहे.

जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत जिल्ह्यातील सातही तालुक्यात राहणाऱ्या शून्य ते ६ वर्ष वयोगटातील ८५ हजार ३४६ बालकांचे मार्च महिन्यात सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणात ७९ हजार ९७२ बालके ही साधारण वजनाची आढळली. सदर बालकांची वाढ ही सामान्य असल्यामुळे ते कुपाेषणापासून लांब आहेत. परंतु चार हजार ७३८ बालके ही मध्यम कमी वजनाची व ६३६ बालके ही तीव्र कमी वजनाची आढळली. मध्यम कमी व तीव्र कमी वजनाच्या बालकांची संख्या अधिक असल्यामुळे त्यांच्या आराेग्याची तपासणी केली असता ८४ बालक अतितीव्र कुपाेषित तर ४५४ बालके ही मध्यम तीव्र कुपाेषित आढळली. जिल्ह्यातील अकाेट व तेल्हारा तालुक्यात कुपाेषणाची स्थिती गंभीर असल्याचे सर्वेक्षणाच्या आकडेवारीवरून लक्षात येते.

अकाेट तालुक्यात सर्वाधिक २२ बालके ही अतितीव्र तर १०० बालके ही मध्यम तीव्र कुपाेषित आढळली आहेत. तर तेल्हारा तालुक्यात १२ बालके ही अतितीव्र व १०३ बालके ही मध्यम तीव्र, बार्शीटाकळी तालुक्यात १६ बालके अतितीव्र तर ६८ बालके मध्यम तीव्र कुपाेषित आढळली आहेत. इतर तालुक्यात सुद्धा कुपाेषित बालक अाढळले असल्यामुळे कुपाेषणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययाेजना ह्या कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे. 

Web Title: 500 child suffered by malnutrition