अमरावतीत पावसाची संततधार, ५०० गावांसह २३ हजार हेक्टर शेती बाधित

अमरावतीत पावसाची संततधार, ५०० गावांसह २३ हजार हेक्टर शेती बाधित

अमरावती : संततधार पावसाने (amravati rain update) जिल्ह्यातील 500 गावे बाधित झाली असून, सुमारे 23 हजार 555 हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. शेतजमीन खरडून झालेले नुकसानीचे क्षेत्र 881 हेक्टर आहे. 142 गावांत पंचनामे पूर्ण झाले असून, 258 गावांत सुरू आहेत. (500 villages affected due to heavy rain in amravati)

अमरावतीत पावसाची संततधार, ५०० गावांसह २३ हजार हेक्टर शेती बाधित
नाना पटोले फडणवीसांच्या मतदारसंघावर करणार दावा?

अमरावती तालुक्यात 14 गावे व 500 हेक्टर शेती, भातकुली तालुक्यात 137 गावे व 6 हजार 22 हेक्टर शेती बाधित आहे. भातकुली तालुक्यात शेतजमीन खरडून नुकसानीचे क्षेत्र 669 हेक्टर व चांदूररेल्वे तालुक्यात 27 गावे बाधित व 119.92 हेक्टर शेतजमीन खरडून नुकसान झाले आहे. नांदगावखंडेश्वर तालुक्यात शेतजमीन खरडून नुकसानीचे क्षेत्र 15.79 हेक्टर व बाधित गावांची संख्या 5 आहे. मोर्शी तालुक्यात 2 गावे 139.6 हेक्टर शेती बाधित आहे.

अतिवृष्टीने बाधित गावांमध्ये पंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया मिशनमोडवर पूर्ण करावी. आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना परिपूर्ण भरपाई मिळावी. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून व दु:ख जाणून संवेदनशीलतेने ही प्रक्रिया पार पाडावी. एकही नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित राहता कामानये, असे सुस्पष्ट निर्देश पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. ठाकूर यांनी गत दोन दिवसांत पुसदा, शिराळा, खारतळेगाव, रामा, साऊर, टाकरखेडा संभू, देवरा, देवरी, ब्राह्मणवाडा आदी अतिवृष्टीग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली व ग्रामीण नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर याबाबतची कार्यवाही व प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी प्रशासनाची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंत वानखडे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, पोलिस आयुक्त आरती सिंह, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, सहायक जिल्हाधिकारी मंदार पत्की, अपर पोलिस अधीक्षक श्याम घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्यासह विविध उपविभागीय अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.

दर्यापूर तालुक्यात मोठे नुकसान -

दर्यापूर तालुक्यात 154 गावे व 12 हजार 844 हेक्टर, अंजनगावसुर्जी तालुक्यात 45 गावे व 393 हेक्टर, चिखलदरा तालुक्यात 73 गावे व 1 हजार 108 हेक्टर, तर चांदूरबाजार तालुक्यात 43 गावे व 2 हजार 549 हेक्टर शेती बाधित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com