जिल्ह्यात दगावले ५०८ एड्‌सग्रस्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

नियंत्रणासाठी मंजूर झाले १७ लाख, खर्च १२ लाख

नागपूर - ‘एचआयव्ही’ची लागण तसेच ‘एड्‌स’ने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न होत आहेत. अद्याप या प्रयत्नाला फारसे यश आलेले नाही. जनजागृतीसाठी ‘शून्य गाठण्याचा संकल्प’ थीम घेत आराखडा तयार केला. परंतु, एचआयव्हीची बाधा असलेल्या २ हजार ३४४ व्यक्‍ती आढळल्या असून, दोन वर्षांत ५०८ जण एड्‌सने दगावले आहेत.  

नवीन एचआयव्ही संसर्ग होऊ द्यायचा नाही. संसर्गीतांबद्दलचा सामाजिक भेदभावाचा कलंक पुसायचा आणि एड्‌सने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासंदर्भातील आराखडा तयार झाला. परंतु, अंमलबजावणीत आढळून येणाऱ्या त्रुटींमुळे शून्य गाठणे अद्याप दूर आहे. १ जानेवारी २०१४ ते ३१ डिसेंबर २०१६ या दोन वर्षांच्या कालावधीत नागपूर जिल्ह्यात २ हजार ३४४ एचआयव्ही बाधित आढळले. तर, ५०८ एड्‌सग्रस्त दगावले.

‘एचआयव्ही’चा नवीन संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षित लैंगिक संबंधाच्या महत्त्वाबाबत व्यापक मार्गदर्शनाची गरज आहे. यासंदर्भातील जनजागृतीसाठी बहुमाध्यम साधनांचा वापर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जात आहे. दोन वर्षांत १७ लाख ११ हजार ४३० रुपये मंजूर करण्यात आला. परंतु, प्रत्यक्षात अवघे १२ लाख ८८ हजार रुपये खर्च झाले. उर्वरित पाच लाख रुपये खर्च करण्यात आरोग्य विभागाला अपयश आले असल्याचे अभय कोलारकर यांना माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीतून पुढे आले. 

जनजागरणासाठी झालेल्या जाहिरातीवर केवळ ९१ हजार रुपये खर्च करण्यात आला. यामुळे ‘एचआयव्ही’ जनजागृतीचा कार्यक्रम समाजाच्या सर्वस्तरापर्यंत पोहचू शकला नसल्याचे स्पष्ट होते. 

वर्धेत १ हजार एचआयव्हीबाधित
‘एचआयव्ही’ संसर्ग केवळ मेट्रो शहरापुरता मर्यादित नाही. वर्धा जिल्ह्यातही दोन वर्षांत १ हजार २३ व्यक्ती एचआयव्हीच्या विळख्यात सापडल्या असून, ९० जणांचा मृत्यू झाला. ८ लाख  ५० हजार ६१४ रुपये खर्च झाले. भंडारा जिल्ह्यात एचआयव्हीबाधिताचे ३१ रुग्ण असून,  यातील ४ जणांचा मृत्यू झाला. मात्र, एचआयव्ही नियंत्रणावर ११ लाखांपेक्षा जास्त निधी खर्च झाला असल्याची माहिती पुढे आली.

Web Title: 508 aids affected death