नागपूर - तीन एटीएम फोडून 55 लाखाची चोरी 

thief
thief

नागपूर : जरीपटक्‍यातील तीन एटीएमला चोरट्यांच्या टोळीने लक्ष्य केले. या एटीएममधून तब्बल 55 लाख रूपयांवर चोरट्यांनी हात साफ केला. ही घटना आज मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेवरून शहरातील एटीएम किती सुरक्षित आहेत, सुरक्षेसंदर्भात बॅंक प्रशासन किती गंभीर आहेत, हे उघडकीस आले आहे. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी गुन्हे दाखल केले. हा सर्व प्रकार संपेपर्यंत शहर पोलिस दलातील एकही गस्तीवाहन या परिसरातून फिरकले नाही, हे विशेष. ही घटना उघडकीस येताच एकच खळबळ उडाली. पोलिसांनी एसबीआय बॅंकेचे व्यवस्थापक सुधीर माटे (झिंगाबाई टाकळी) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. 

पहिली घटना...
जरीपटक्‍यातील पॉवरग्रीड चौकात स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. तेथे सुरक्षा रक्षक तैनात नाही. याचाच फायदा एटीएम फोडणाऱ्या टोळीने घेतला. मंगळवारी पहाटेच्या सुमारास कारने आलेल्या पाच ते सहा चोरटे आले. त्यांनी चेहरा रूमालाने झाकलेला होता. त्यांनी गॅस कटरने एटीएम मशिन कापली. त्या एटीएममधील 11 लाख 35 हजार रूपये चोरून पळ काढला. 

दुसरी घटना... 
चोरट्यांच्या टोळीने पहिला एटीएम लुटल्यानंतर मोर्चा पाटनकर चौक ते भीम चौक या रस्त्यावर मिसाळ लेआउटवर असलेल्या एसबीआयच्या दुसऱ्या एटीएमकडे वळविला. चोरट्यांनी कार थांबवली. चौघे जण खाली उतरले. दोघांनी गॅस कटरने एटीएम मशिन कापली. मशिनच्या कॅश बॉक्‍समधील 16 लाख 10 हजार 600 रूपये लगबगीने बॅगेत भरले. 

तिसरी घटना...
जवळपास 21 लाख रूपये लुटल्यानंतर चोरट्यांनी बाजुच्याच एसबीआयच्या तिसऱ्या एटीएमला "टार्गेट' केले. तिसरे एटीएम फोडताना चोरट्यांनी वेळ पाहता लगबगीने काम केले. एटीएम गॅस कटरने मशिन कापली. मशिनच्या कॅश बॉक्‍समधील 27 लाख 24 हजार 300 रूपयांच्या नोटा अक्षरशः दोन्ही हाताने लुटल्या. लगेच दुसऱ्या बॅगमध्ये भरल्या. या ठिकाणी चोरटे जवळपास अर्धा तास उभे होते. सर्व कॅश घेऊन चोरट्यांनी कारने पळ काढला. 

चोरट्यांची हुशारी 
तीनही एटीएमवर चेहरा झाकून गेलेल्या चोरट्‌यांनी सर्वप्रथम एटीएममधील सीसीटीव्ही फोडला. सीसीटीव्हीचा "डिजीटल व्हिडीओ रेकॉर्डर' बॉक्‍स हातोड्याने फोडून टाकला. जेणेकरून चोरट्यांचे कोणतेही फोटो-फुटेज पोलिसांच्या हाती लागू नये. तसेच चोरट्यांनी दोन डीव्हीआर बॉक्‍सची वायर कापून बॉक्‍स सोबत नेले. या हुशारीमुळे पोलिस चाट पडले. 

व्वारे रे डिजीटल नागपूर 
शहरातील रस्त्यांवर "स्मार्ट सीटी' अंतर्गत तीन हजार सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. कोणत्या चौकात काय सुरू आहे? हे एकाच डीजीटल रूममधून पोलिसांना कळते. मात्र, चोरट्यांची टोळी कोणत्या मार्गाने आली आणि कुठे बेपत्ता झाली? याबाबत पोलिस संभ्रमात आहेत. पहाटेच्या सुमारास चोरटे येतात आणि 55 लाखांची कॅश लुटून नेतात. मात्र, पोलिस निद्रावस्थेतच राहत असल्याची चर्चा आहे. 

पॅट्रोलिंग गेले कुठे? 
जरीपटका पोलिस परिसरात रात्रभर गस्त घालीत होते, असा दावा करतात. मात्र, तीन एटीएम फोडण्यास चोरट्यांना जवळपास तासाभराचा अवधी लागला. या वेळेत एकही पोलिस कर्मचारी पॅट्रोलिंगवर नव्हता. त्यामुळे पोलिस आयुक्‍तांच्या आदोला पोलिस शिपायी ते पोलिस उपनिरीक्षक केराची टोपली दाखवत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com