५५ टक्के इंजिनिअर्ससमोर बेरोजगारीचे संकट!

unemployment.jpg
unemployment.jpg

अकोला : इंजिनिअर होऊन झटपट नोकरी मिळविण्याचं स्वप्न तरूण पाहत आहेत. गतवर्षी देशातील मान्यताप्राप्त इंजिनिअरिंग कॉलेजमधून सात लाख ९२ हजार विद्यार्थ्यांनी पदवी घेतली. यामधून जवळपास ४५ टक्के म्हणजे तीन लाख ५९ हजार विद्यार्थ्यांना कॅम्पसच्या माध्यमातून नोकरी मिळाली तर ५५ टक्के इजिनिअर्ससमोर बेरोजगारीचे संकट उभे राहिले आहे.

नोकऱ्या मिळण्याचे प्रमाण कमी होऊ लागल्याने इंजिनिअरिंग कॉलेजेस ओस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद (एआयसीटीई) मान्यताप्राप्त इंजिनियरिंग कॉलेजेसमधून २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात सात लाख ९२ हजार विद्यार्थ्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यातील तीन लाख ५९ हजार इंजिनियर्सना कँपस प्लेसमेंटमध्ये नोकरीचे पत्र मिळाले. काही विद्यार्थी मास्टर्सचे शिक्षण घेत आहेत, तर काहींनी वैयक्तिकरित्या नोकरी अथवा व्यवसायाकडे वळले असल्याची माहिती आहे. 

काळानुरुप बदलताहेत अभ्यासक्रम
परंपरागत पध्दतीने इंजिनियरिंगचे शिक्षण देण्याऐवजी कुशल रोजगार निर्माण करणारे शिक्षण देण्यासाठी अभ्यासक्रमात बदल केले जात आहेत. यात कृत्रिम बुध्दीमत्ता, इंटरनेटयुक्त, ब्लॉकचेन, रोबोटिक्स, क्वाँटम कॉम्युटिंग, डेटा सायन्सेस, सायबर सिक्युरिटी, थ्रीडी प्रिंटींग आणि डिझाइन तसेच व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी यांच्यावर सध्या अधिक लक्ष केंद्रीत केले जात आहे. 

नवीन कॉलेज बंद
इंजिनियरिंगमधील नोकऱ्या वाढव्यात यासाठी २०२० पासून नव्या कॉलेजेसना मान्यता नाकारण्याचा निर्णय गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विशेष समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत प्रशिक्षण सक्तीचे करण्यात येत आहे. तसेच मान्यताप्राप्त इंजिनियरिंग कॉलेजेसमध्ये दर्जेदार शिक्षणावर भर दिला जात आहे.  

इंजिनियरिंगकडे विद्यार्थ्यांची पाठ
इंजिनियरिंग कॉलेजेस बंद करणे अथवा विद्यार्थी संख्या कमी करणे हा यावर उपाय नसून शासनाने केवळ आयटीमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी अन्य क्षेत्रांकडेही लक्ष दिले पाहिजे. सिव्हील, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक या शाखेतील विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत नसल्याने या शाखांकडे विद्यार्थी पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com