अकोला महापालिकेसाठी ५५.९१ टक्के मतदान 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

अकोला - महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी (ता.२१) अकोल्यात ५५.९१ टक्के मतदान झाले. २० प्रभागात ८० जागांसाठी एकूण दोन लाख ६६ हजार ९३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावित ५७९ उमदेवारांचे भाग्य सील केले. आता सर्वांचे लक्ष गुरुवारी (ता.२३) होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे. अकोला महापालिकेसाठी २०१२ मध्येसुद्धा ५६ टक्केच मतदान झाले होते. त्यामुळे पुन्हा एकदा मनपाची स्थिती त्रिशंकुच राहण्याची शक्यता आहे. मतदार याद्यांमध्ये एेनवेळी झालेल्या बदलामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. 

अकोला महापालिकेच्या २० प्रभागातील ८० जागांसाठी मंगळवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत ५८७ मतदाना केंद्रांवर शांतेत मतदान झाले. काही ठिकाणी किरकोळ वाद प्रसंग वगळता मतदारांनी शांततेत मतदान करीत ५७९ उमेदवारांचे भाग्य मतदान यंत्रात सील केले. शहरातील चार लाख ७७ हजार ४७२ मतदारांपैकी दोन लाख ६६ हजार ९३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. यात दोन लाख ४६ हजार ३४८ पुरुष मतदारांपैकी एक लाख ४१ हजार ९४१ तर दोन लाख ३१ हजार १०१ स्त्री मतदारांपैकी एक लाख २४ हजार ९९१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. सर्वाधिक ६२.३६ टक्के मतदान सिंधी कॅम्प परिसरातील प्रभाग १६ मध्ये झाले. सर्वात कमी मतदान रामदासपेठ परिसरातील प्रभाग ६ मध्ये ४५.३२ टक्के झाले. 

Web Title: 55.9 percent of the vote for akola municipal