56 वी राज्य नाट्यस्पर्धा बुधवारपासून चंद्रपुरात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

यवतमाळ - राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी हौशी मराठी नाट्यस्पर्धा घेण्यात येतात. या स्पर्धेचे यंदाचे हे 56 वे वर्षे आहे. या स्पर्धा यंदा बुधवार (ता. नऊ)पासून चंद्रपूर येथे होत आहेत. या स्पर्धेत यवतमाळ, चंद्रपूर व वर्धा येथील 14 नाटकांचा समावेश राहणार आहे. तर बालनाट्य स्पर्धांची प्राथमिक फेरी 5 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

या स्पर्धेची प्राथमिक फेरी सात नोव्हेंबरपासून दिल्ली, गोवा व महाराष्ट्रातील विविध 19 केंद्रांसह एकूण 21 केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे. नागपूर महसुली विभागातील स्पर्धा नागपूर, अमरावती व चंद्रपूर अशा तीन विभागांत होतील. यात चंद्रपूर केंद्रावर यवतमाळ येथील नऊ, चंद्रपूर येथील चार, तर वर्धेतील एक नाटक या प्राथमिक फेरीत सादर होईल. नऊ नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबरदरम्यान येथे या स्पर्धा पार पडतील. सायंकाळी सातला चंद्रपूर येथील वन प्रशिक्षण अकादमीच्या सभागृहात सर्व प्रयोग सादर होतील. या प्रयोगांमध्ये बुधवार (ता. नऊ) सायंकाळी सातला अध्ययन भारती, वर्धाचे लेखक-दिग्दर्शक हरीश इथापे यांचा प्रयोग "आडवी बाटली', आदिवासी लोकरंग कलामंच, वणी, यवतमाळचे श्‍याम फडके यांचे गुरुवार (ता. 10) "जय रंभे भागीरथी', तेजांकूर बहुद्देशीय संस्था, यवतमाळच्या अपूर्वा सोनार यांचे शुक्रवारी (ता. 11) "ज्योतिबाची सावली-सावित्री माउली', कल्याण बहुद्देशीय संस्था, यवतमाळचे जयंत पवार यांचे शनिवारी (ता. 12) "अधांतर', या प्रयोगांचा समावेश आहे. 23 नोव्हेंबरपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. तसेच बालनाट्य स्पर्धांची प्राथमिक फेरी 5 डिसेंबरपासून एकूण पाच महसुली विभागात आयोजित करण्यात येणार आहे.

Web Title: 56 th state drama competition from Chandrapur