
गोंडपिपरी तालुक्यातील फुर्डी हेटी येथील शैलेश नानाजी गौरकार या युवा शेतकऱ्याला रविवारी (ता. 10) एका फोन आला. तुमचा फोन पे अकाउंटला चार हजार रुपयांचे बक्षीस लागल्याचे सांगण्यात आले.
गोंडपिपरी (जि. चंद्रपूर ) : तुमच्या फोन पे अकाउंटला स्पेशल ऑफर मिळाली आहे. तुम्हाला चार हजार रुपयांचे बक्षीस लागले आहे, असे सांगत अज्ञाताने एका तरुण शेतकऱ्याचे 59 हजार रुपये लुटले. झालेला प्रकार लक्षात येताच शेतकऱ्याला डोक्यावर हात मारल्याशिवाय पर्याय उरला नाही. रविवारी (ता. 11) गोंडपिपरी तालुक्यातील फुर्डी हेटी गावात घडलेल्या या प्रकाराची पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हेही वाचा - घरात लक्ष्मी आली म्हणून बाप वाटत होता पेढे, पण एक फोन आला अन् सर्वच संपलं
गोंडपिपरी तालुक्यातील फुर्डी हेटी येथील शैलेश नानाजी गौरकार या युवा शेतकऱ्याला रविवारी (ता. 10) एका फोन आला. तुमचा फोन पे अकाउंटला चार हजार रुपयांचे बक्षीस लागल्याचे सांगण्यात आले. यानंतर शेतकरी जाम खुश झाला. यानंतर शेतकऱ्याला भ्रमणध्वनीवरून तुमच्या अकांउंटमध्ये जेवढी रक्कम आहे ती आमच्याकडे पाठवा. नंतर चार हजार रुपयासह संपूर्ण रक्कम तुमच्या खात्यात जमा करण्यात येईल, असे सांगण्यात आले. यानंतर गौरकारने तब्बल नवदा त्याच्या अकांउटवर खात्यात असलेले 59 हजार रुपये पाठविले अन् चार हजार रुपयाच्या बक्षीसासह एकूण रक्कम येण्याची वाट बघू लागला. पण काही वेळातच भ्रमणध्वनी बंद झाला. आपली फसवूणक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. चार हजार रुपयांच्या नादात वर्षभर मेहनत करून कमविलेली रक्कम भामट्याने लंपास केल्याचे समजताच शेतकऱ्याने डोक्यावर हात मारला. सोमवारी (ता. 11) या शेतकऱ्याने गोंडपिपरी पोलिसात घटनेची तक्रार दाखल केली.