रामटेक ः तोतलाडोह धरणाच्या उघडलेल्या गेटमधून होत असलेला पाण्याचा विसर्ग.
रामटेक ः तोतलाडोह धरणाच्या उघडलेल्या गेटमधून होत असलेला पाण्याचा विसर्ग.

तोतलाडोह धरणाचे 6 गेट उघडले

रामटेक (जि.नागपूर) :  शेतक-यांसह नागपूर महानगर पालिकेच्या तोंडचे पाणी पळविणा-या तोतलाडोह धरणाचे सहा गेट बुधवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास 30 सेंटीमिटरने उघडण्यात आले. दरसेंकदाला 310 क्‍युमेक मिटरने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 
तोतलाडोह धरणाची यावर्षी अभूतपुर्व परिस्थिती उद्‌भवली. तोतलाडोह धरणाने तळ गाठला होता. धरणातील पाणी पेंच प्रकल्पात साठवले जाते. तेथून कालव्याने नागपूर व भंडारा जिल्ह्यातील एक लाख हेक्‍टरच्यावर शेतीला पाणी दिले जाते. नागपूर महानगर पालिकादेखील शहरातील नागरिकांची तहान यातील पाण्यावरच भागविते. मात्र तोतलाडोह धरणाच्या वरच्या भागात पेंच नदीवर मध्य प्रदेश शासनाने चौराई धरण बांधल्याने आणि मागील वर्षी पावसाने पाठ फिरविल्याने तोतलाडोह धरणाच्या पाण्यावरील शेतीचे सिंचन न झाल्याने शेतकरी हवालदील झाला. नागपूर महानगर पालिकेने देखील पाण्याची कपात केली होती. मात्र यावर्षी मध्य प्रदेशात चांगला पाऊस झाल्याने त्यांनी चौराई धरणाचे गेट उघडले. त्यामुळे तोतलाडोह धरणात 94.89टक्‍के जलसाठा झाला. त्यामुळे बुधवारी संध्याकाळी साडेसहा वाजता तोतलाडोह धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले. शेतक-यांत आनंदाचे वातावरण असून नागपूर महानगर पालिकेच्या पदाधिका-यांचेही चेहरे आनंदाने उजळले आहेत. फक्त त्यांनी गरजेनुसार पाणी घेऊन नागरिकांना पाण्याची काटकसर करण्याचे प्रशिक्षण देण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्‍त होत आहेत. 
आमदार रेड्‌डींचा"वरूण यज्ञ' 
रामटेक ः आमदार डी.मल्लिकार्जून रेड्डी यांनी 19 जुलै रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात "वरूण यज्ञ' केला. त्यामुळेच वरूण देव प्रसन्न होऊन भरपूर पाऊस येत असून रामटेक परिसरातील तलाव तुडूंब भरले आहेत. नाल्यांना पूर आला आहे, असा दावा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक क्रिष्णा मस्के यांनी व्हॉटस ऍप ग्रुपवर केला आहे. त्यामुळे आमदारांनी दरवर्षी असा "वरूण यज्ञ " करून भरपूर पाऊस पाडावा अशी जनतेत चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com