अहेरी दलम कमांडरसह सहा नक्षलवादी ठार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

गडचिरोली - अहेरी तालुक्‍यातील राजाराम खांदला जंगल परिसरात आज रात्री नऊच्या सुमारास पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत अहेरी नक्षल दलम कमांडर नंदू याच्यासह सहा नक्षलवादी ठार झाले. या सहाही नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांना मिळाले आहेत.

छत्तीसगड सीमेलगत रविवारी सकाळी झालेल्या चकमकीनंतर काही नक्षलवादी पसार झाले होते. त्यांच्या मागावर नक्षलविरोधी पथक होते. अहेरी तालुक्‍यातील राजाराम खांदला जंगल परिसरात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अहेरी दलम कमांडर नंदू याच्यासह सहा नक्षलवादी ठार झाले. रात्री उशिरापर्यंत ही चकमक सुरू होती. खबऱ्याच्या माहितीवरून आज दिवसभर घनदाट जंगलात हेलिकॉप्टरद्वारे शोधमोहीम सुरू होती.

Web Title: 6 naxalite death in Flint