गोरेगाव( गोंदिया) | गाव कामगार पोलीस पाटील संघटनेतुन 6 जण निष्कासीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

गोरेगाव( गोंदिया) : महाराष्ट राज्य गाव कामगार पोलीस पाटील जिल्हा कार्यकारणीत बदल करावयाचा असेल तर राज्य संघटनेला पत्रव्यवहार करुन आपली तक्रार करावी लागते पण परवानगी न घेता सहा गाव कामगार पोलीस पाटलांनी नवीन जिल्हा कार्यकारणीची घोषणा केल्याने चार पुरुष व दोन महीला पोलीस पाटीलांना संघटनेतुन ता. १२ एप्रील ला निष्कासीत केल्याची माहीती राज्य कार्याध्यक्ष भूंगराज परशुरामकर यांनी पंचायत समिती सभागूहात ता. १२/४ ला झालेल्या पत्रकार परिषदेत माहीती दिली. 

गोंदिया जिल्ह्यातील गाव कामगार पोलीस पाटील जिल्हा उपाध्यक्ष आनंद तुरकर काटी, जिल्हा सचीव मनोहर चव्हाण खमारी, महीला संघटना जिल्हा सचीव गायत्री पवार घाटी,संघटनमंत्री मोहन बघेल पानगाव, प्रविण कोचे मुर्री, नर्मदा चुटे आमगाव  यांनी बंडखोरी करुन जिल्हा संघटना तयार केली संघटनेच्या नियमांना डावलुन संघटना तयार केल्याने त्यांना जिल्हा संघटनेतुन १ वर्षाकरीता निष्कासीत केल्याची परशुरामकर यांनी माहीती दिली.   

त्याऐवजी जिल्हा उपाध्यक्षपदी रमेश टेंभरे, जिल्हा सचीव राजेश बंसोड, कोषाध्यक्ष श्रीराम झिंगरे यांची निवड करण्यात आली व महीला आघाडी गाव कामगार पोलीस पाटील संघटनेत जिल्हा अध्यक्ष नंदा ठाकरे, जिल्हा उपाध्यक्षपदी अनिता लंजे यांची निवड करण्यात आली या संदर्भात जिल्हा संघटनेचा ठराव घेण्यात आला या सहा निष्कासीत गाव कामगार पोलीस पाटीलांसी इतर पोलीस पाटील यांनी सहकार्य करु नये  तसेच महाराष्ट राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचा बॅनरचा वापर करु देवु नये असे आवाहन राज्य कार्याध्यक्ष भूंगराज परशुरामकर यांनी यावेळी केले. पत्रकार परिषदेत जिल्हा अध्यक्ष दिलीप मेश्राम, राज्य कार्याध्यध भूंगराज परशुरामकर, श्रीराम झिंगरे, रमेश टेंभरे, राजेश बंसोड, कोमेश कटरे, लोकचंद भांडारकर, बनवाली मंडल, प्रकाश कठाणे, हेमराज सोनवाने, गजानन जांभुरकर, चंद्रहास भांडारकर उपस्थित होते.

Web Title: 6 people removed from an organisation of police patil