क्या बात है! पुसदचे बालवैज्ञानिक घेणार अंतराळात झेप; माऊंट लिट्रा झी स्कूलच्या सहा विद्यार्थ्यांची निवड

6 students of Mount Litra school Pusad Yavatmal selcted for launching mini satellites
6 students of Mount Litra school Pusad Yavatmal selcted for launching mini satellites

पुसद (जि. यवतमाळ): : तामिळनाडू येथील रामेश्वरम येथे सात फेब्रुवारी 2021 रोजी जगातील कमी वजनाचे 100 उपग्रह अंतराळात सोडले जाणार आहेत. हे उपग्रह भारतातील एक हजार विद्यार्थ्यांद्वारा तयार करण्यात येणार आहेत. या प्रकल्पाची नोंद जागतिक विक्रम, आशिया विक्रम व इंडिया विक्रममध्ये होणार आहे. या प्रकल्पात पुसद येथील माउंट लिट्रा झी स्कूलने सहभाग नोंदवीत अंतराळात झेप घेण्याची संधी पुसद परिसरातील विद्यार्थ्यांना प्राप्त करून दिली आहे.

डॉ. एपीजे अब्दुल कलाम स्पेस रिसर्च पेलोड कबेस 2021 या प्रकल्पाअंतर्गत जगात सर्वात कमी वजनाचे 25 ग्रॅम ते 80 ग्रॅम वजनाचे 100 उपग्रह तयार करून त्यांना 35 हजार ते 38 हजार मीटर उंचीवर हाय ऍप्टिट्यूड सायंटिफिक बलूनद्वारे अवकाशात प्रस्थापित करण्यात येणार आहे. तेथून प्रत्यक्ष वातावरणाची माहिती हे उपग्रह पाठवतील. 

विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात मोठी स्वप्ने पाहावी व ती पूर्ण करण्याच्या दिशेने प्रवास करावा, या डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या विचारांतून या संस्थेची स्थापना झाली असून, हा जागतिक विक्रम करण्याचा संकल्प संस्थेने केला आहे.

झी स्कूल व परिसरातील विद्यार्थी राज चिद्दरवार, तन्वी गट्टाणी, तनिष्का नागरे, उन्नती देऊळकर, गौरी देऊळकर, श्रेयस जिल्हेवार यांची या प्रकल्पासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांना संस्थेचे विज्ञान विभागाचे मार्गदर्शक, ज्ञान फाउंडेशनचे संस्थापक, स्कूल इनोव्हेटिव्ह लॅबचे प्रमुख अजिंक्‍य कोत्तावार, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाउंडेशनचे मिलिंद चौधरी, मनीषा चौधरी, डॉ. विशाल लिचडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. माउंट लिट्रा झी स्कूलच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांनी या प्रकारच्या प्रकल्पामध्ये प्रथमच सहभाग घेत पुसद परिसराला नवीन संधी प्राप्त करून दिली आहे. यामध्ये संस्थाचालक, उपप्राचार्य रविष प्रजापती, शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य आहे.

निवड झालेले बालवैज्ञानिक

झी स्कूल व परिसरातील विद्यार्थी राज चिद्दरवार, तन्वी गट्टाणी, तनिष्का नागरे, उन्नती देऊळकर, गौरी देऊळकर, श्रेयस जिल्हेवार यांची या प्रकल्पासाठी निवड करण्यात आली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com