कर्करोगाने दरवर्षी ६० लाख मृत्यू - डॉ. सुशील मानधनिया

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

नागपूर - तंबाखू गुटखा जीवघेणा... याला आताच नाही म्हणा...’ असा प्रचार-प्रसार जनमानसांत केला जात असूनही तंबाखू सेवनाचे प्रमाण शहर आणि ग्रामीण भागात वाढत आहे. तंबाखू सेवनामुळे विदर्भ ‘हेड ॲण्ड नेक कॅन्सर’ची राजधानी बनत आहे. तंबाखूजन्य पदार्थांमुळे लाखात २४ रुग्ण कर्करोगाचे आहेत, असे निदान सर्वेक्षणातून पुढे आल्याची माहिती प्रसिद्ध कॅन्सररोगतज्ज्ञ डॉ. सुशील मानधनिया यांनी दिली. 

तंबाखूविरोधी दिनाचे निमित्त साधून डॉ. मानधनिया यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, दर सहा सेकंदाला एक व्यक्ती तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांना बळी पडतो. त्यापैकी एक प्रौढ असतो. तंबाखूमुळे जगात वर्षाला ६० लाख व्यक्ती मृत्युमुखी पडतात. यात १० लाख भारतीयांचा समावेश आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातून पुढे आले. 

विशेष असे की, कॅन्सरग्रस्तांमध्ये ८० टक्के कमी आणि मध्यम उत्पन्न गटातील व्यक्तींचा समावेश आहे. देशांत दगावणाऱ्यांपैकी ७ टक्के मृत्यू तंबाखुजन्य पदार्थांमुळे होत असून, या मृत्यूत १२ टक्के पुरुष आणि एक टक्का महिलांचा समावेश आहे, असे डॉ. मानधनिया म्हणाले. 

विदर्भात मोठ्या प्रमाणात तंबाखू आणि गुटखा सेवन होत असल्याने हेड ॲण्ड नेक कॅन्सरची राजधानी बनत असून, या कॅन्सरचे सुमारे ३५ टक्के रुग्ण विदर्भात आहेत.

जगात दरवर्षी होणाऱ्या ८० लाख मृत्यूंमध्ये १५ लाख भारतीय असतील. देशात आरोग्यावर होणाऱ्या खर्चापेक्षा अधिक खर्च कॅन्सरवरील नियंत्रण तसेच उपचारावर होतो. त्या तुलनेत १० टक्के महसूलही सरकारला तंबाखूजन्य पदार्थांपासून मिळत नाही. तंबाखूमुळे कॅन्सरसह हृदय, फुप्फुस, क्षयरोगासह रक्तदाबाचाही मोठ्या प्रमाणात धोका आहे. गर्भवती मातांच्या पोटात वाढणाऱ्या चिमुकल्या जीवांनाही धोका आहे. 
- डॉ. सुशील मानधनिया, कॅन्सररोगतज्ज्ञ, नागपूर

Web Title: 60 lakh death by cancer dr. sushil mandhania