नोकरीचे आमिष दाखवून 60 हजारांनी फसविले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जुलै 2019

वणी (जि. यवतमाळ) : दुबई येथे नोकरी मिळवून देण्याचा बहाणा करून येथील गुरूनगरात तरुणाची 60 हजार रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणी वणी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.

वणी (जि. यवतमाळ) : दुबई येथे नोकरी मिळवून देण्याचा बहाणा करून येथील गुरूनगरात तरुणाची 60 हजार रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणी वणी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
सय्यद इरफान अली सय्यद अखतर अली (वय 31) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो चेन्नई येथील उधयम या कंपनीत जेसीबी ऑपरेटर म्हणून काम करीत होता. त्याने हे काम सोडल्याने तो नवीन कामाच्या शोधात होता. सय्यद इरफान ऑनलाइन येणाऱ्या जाहिराती बघून बायोडाटा पाठवीत होता. 31 ऑगस्ट 2018ला तन्वीर नावाच्या व्यक्तीने त्याला मेल पाठविला. तुझ्यासाठी दुबई येथे काम असल्याचे सांगितल्याने बेरोजगार तरुणाने त्याला लगेच होकार दिला. त्या व्यक्तीने दुबई येथील कंपनीचे नियुक्तीपत्र पाठवून 15 हजारांची मागणी केली. तरुणाने भीम ऍपद्वारे पैसे पाठविले. त्यानंतर वेळोवेळी व्हीजा काढण्यासाठी दहा हजार, दुबईचे तिकीट काढण्यासाठी 53 हजार अशी मागणी करताच पूर्ण करण्यात आली. मात्र, काही दिवसांनी त्याचा फोन लागत नव्हता. त्यामुळे आपली फसगत झाल्याचे कळल्याने तरुणाने वणी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तन्वीर (रा. प्रल्हादनगर, अहमदाबाद) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 60 thousand cheated by showing bait for the job