जवळा येथे 61 हजारांचा गुटखा जप्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

यवतमाळ : प्रतिबंधित असलेला गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू असा एकूण 61 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शुक्रवारी (ता.27) आर्णी तालुक्‍यातील जवळा येथे केली.

महाराष्ट्रात उत्पादन, विक्री, साठवणूक व वाहतुकीसाठी प्रतिबंधित केलेला गुटखा सुरेश किसन खंदार (रा. जवळा) या व्यक्तीने साठवून ठेवल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यांनी छापा टाकला असता 500 पॅकेट सम्राट गुटखा, दीडशे पॅकेश आर. के. पानमसाला, दीडशे पॅकेट आर. के. सुगंधित तंबाखू असा एकूण 61 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुरेश खंदार याच्याविरुद्ध अन्नसुरक्षा व मानदे कायदा 2006 अन्वये कारवाई करण्यात आली. ही कारवाई सहायक आयुक्त सचिन केदारे यांच्या मार्गदर्शनात अन्नसुरक्षा अधिकारी गोपाल माहोरे, संदीप सूर्यवंशी, नमूना सहायक मधुकर चव्हाण यांनी केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 61 thousand gutkha seized at Jawala